नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिचीतानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास तात्काळ अटक केली आहे. प्रमोद कुमार पंडीत (रा.झापरागाव पहाडपूर,बिहार) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने औद्योगीक वसाहतीतील केवलपार्क भागात राहणा-या परप्रांतीय पीडितेच्या कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडितेचे कुटुंबिय व संशयित एकमेकांचे नातेवाईक असून गेल्या तीन वर्षापासून तो कामधंद्यानिमित्त मुलीच्या घरी वास्तव्यास आहे. पीडितेचे आई वडिल कामानिमित्त घराबाहेर पडले की संशयित मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा उचलून तिच्यावर बलात्कार करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.