नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन लाख रूपये लंपास केले. वडाळा पाथर्डी मार्गावरील सावरकर हॉल पाठीमागील भागात ही घरफोडीची घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले.
याप्रकरणी नितीन दत्तात्रेय वडगावकर (रा.आशिर्वाद बंगला, गणराज कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगावकर कुटुंबिय २८ एप्रिल ते १ मे दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे अलंकार असा सुमारे ३ लाख २७ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक न्यायदे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653698202590408709?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653698168188727301?s=20