नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना महात्मानगर परिसरात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह देवघरातील चांदीच्या मुर्त्या आणि चादीचे भांडे चोरुन नेले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती काशिनाथ बाळ (रा. डीकेनगर, गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. बाळ यांच्या बहिणीचे कुटुंबिय बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बहिणीच्या महात्मानगर येथील शिवकृपा बंगल्याचे कुलूप तोडून ही चोरी केली. ७ ते ११ जुलै दरम्यान हा प्रकार घडला असून घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व देवघरातील चांदीच्या मुर्त्या आणि भांडी असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
संसरी गावात १९ वर्षीय तरूणाची आत्महत्या
१९ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना संसरीगावात घडली. प्रसाद आबाजी म्हैसधुणे (रा.संसरी,दे.कॅम्प) असे मृत युवकाचे नाव आहे. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. म्हैसधुणे याने मंगळवारी (दि.११) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. एम.जे.होनराव करीत आहेत.