नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील राणा प्रताप चौक भागात धारदार तलवारीसह कोयते बाळगणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयितांच्या ताब्यातून तलवारीसह दोन कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोदीप सुशिल पगारे (रा.साने गुरूजी चौक,सिडको) व जयेश अजीतसिंग परदेशी (रा.मुक्तांगण शाळा,राणाप्रताप चौक) अशी धारदारशस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. राणा प्रताप चौकातील जी मार्ट किराणा शॉपजवळ थांबलेल्या दोघांकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
शुक्रवारी (दि.१२) खब-याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाव घेत दोघांची अंगझडती घेतली असता एकाकडे धारदार पितळी मुठ असलेली तलवार तर दुसऱ्याकडे दोन लोखंडी कोयते मिळून आले. याप्रकरणी पोलिस शिपाई प्रविण राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.