नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने इमारतीत सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त करुन १७ जुगारींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ६६ हजाराच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जुने नाशिक परिसरातील खडकाळी भागात ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैनुद्दीन कोकणी,मिना बजाज (रा.सिंधी कॉलनी,चाळीसगाव) तसेच मोहम्मद नागोरी अब्दूल रेहमान (रा.डायमंड रेसि.अंबड लिंकरोड), तौसिफ रफीक पठाण (रा.त्र्यंबक पोलिस चौकी मागे,खडकाळी),मुस्तफा गुलाब शेख (रा.पंचशिलनगर गंजमाळ),जाकीश खान मोहम्मद खान (रा.खडकाळी),गुलाम खाजा शेखनबी (रा.कोकणीपुरा,भद्रकाली),साजीद जैनोद्दीन शेख (रा.कथडा,जुनेनाशिक),फिरोज अमीर शेख (रा.खडकाळी),उजेफा अहमदअली (रा.मोहम्मदी सोसा.टाकळीरोड),समीर जावेद खान (रा.भद्रकाली), अझहर अश्पाक शेख (रा.सादीकनगर,वडाळागाव),अफरोज बिसमिल्ला कुरेशी (रा.बागवानपुरा), इरफान अब्बाद शेख (रा.तलावडी),राजीद लढा कुरेशी (रा.पंचशिलनगर,अकोला),मोहसिन गुलाब कोकणी (रा.पखालरोड) व रिजवान रमजान शेख (रा.खडकाळी) अशी संशयित जुगारींची नावे असून मैनुद्दीन कोकणी आणि मिना बजाज यांना वगळता सर्व जुगारींना अटक करण्यात आली आहे.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे हवालदार प्रविण वाघमारे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खडकाळी येथील मोहम्मदीया मेन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.३१) पोलिसांनी छापा टाकला असता संशयिता पत्यांच्या कॅटवर पैसे लावून तीन पत्ती नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. या कारवाई पंधरा जणांच्या मुसक्या आवळत पोलिसानी सुमारे ६६ हजार १० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत केले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
Nashik City Crime Police Action Old Nashik FIR