नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीस आपल्या घरी बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाणा करून घरी बोलावून हे कृत्य केले आहे. या घटनेची वाच्यता केल्यास अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वंयम कमलेश बनकर (रा.तिडकेनगर, उंटवाडी) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांची मित्र मैत्रीण आहेत. गेल्या सोमवारी (दि.१५) बर्थ डे पार्टी असल्याचे बतावणी करीत संशयिताने अल्पवयीन पीडितेस आपल्या घरी बोलावले होते. दुपारच्या सुमारास मुलगी संशयिताच्या घरी गेली असता ही घटना घडली.
घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयितांने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढले. सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक फडोळ करीत आहेत.