India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गुंडाळणार गाशा ‘हा’ कार्यक्रम होणार सुरू

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरचे जवळपास सगळेच कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असतात. प्रेक्षकांना आवडतील अशा विषयावरील मालिका या लोकप्रिय होतातच, पण अनेक कथाबाह्य कार्यक्रमांना देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळते. याच कार्यक्रमातील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे नितांत प्रेम मिळाले आहे.
असं म्हणतात की, लोकांना रडवण सोपं असतं पण हसवण फार कठीण. आणि ही कठीण गोष्ट कित्येक वर्षे हास्यजत्रेतील कलाकार अगदी लीलया पार पाडत आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांची रजा घेणार असल्याची माहिती मिळते आहे. गेली अनेक वर्षे विशेषत: लॉकडाऊनच्या निराशेच्या काळात या कार्यक्रमाने लोकांचे निखळ मनोरंजन केले. त्यामुळे आता मिळणाऱ्या या माहितीने या कार्यक्रमाचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

नवोदित कलाकारांना संधी
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालं. या संधीचा योग्य फायदा घेत अनेक कलाकार रातोरात स्टार झाले. या कार्यक्रमातील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पण लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

कलाकारांची पोस्ट 
या कार्यक्रमातील प्रियदर्शनी इंदलकर, रसिरा वेंगुर्लेकर आणि गौरव मोरे या कलाकारांनी सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले. सेटवरचा फोटो शेअर करत प्रियदर्शनीने लिहिलं आहे,”दोन महिन्यांनंतर भेटू”. रसिका वेंगुर्लेकरने लिहिलं आहे,”शेवटच्या शेड्युलचा शेवटचा दिवस…या माझ्या अतरंगी मित्रांबरोबरचे शेवटचे काही क्षण”. तर रसिका वेंगुर्लेकर म्हणते, “काळजी करू नका… ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होत नाही. आम्ही संपूर्ण टीम छोटीशी सुट्टी घेत आहोत. लवकरच येऊ तुमच्या भेटीला”.

शेवटचा भाग
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा या आठवड्यात शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. या कार्यक्रमातील समीर चौघुले, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांचे काम नेहमीच नावाजले गेले. तर परीक्षक असलेल्या सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांनादेखील सर्वांची पसंती मिळाली.

पृथ्वीक, वनिता, चेतना आणि समीर यांची भन्नाट कॉमेडी!
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार.
आज रात्री 9 वा.
फक्त आपल्या सोनी मराठीवर!
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra#हास्याचाचौकार | #HasyachaChaukar#सोनीमराठी । #SonyMarathi#विणूयाअतूटनाती । pic.twitter.com/DdsVw9BbM8

— Sony मराठी (@sonymarathitv) May 23, 2023

‘हा’ कार्यक्रम घेणार जागा
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची जागा आता ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घेणार आहे. हा कार्यक्रम देखील प्रेक्षकांचा आवडीचा आहे. २९ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर, असा ‘कोण होणार करोडपती’चा नवा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 29 मेपासून प्रेक्षकांना ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांचे सूत्रसंचालनही प्रेक्षकांना आवडते.

2 करोड कमावण्याची पुन्हा एकदा संधी!
'कोण होणार करोडपती',
29 मेपासून, सोम. ते शनि., रात्री 9 वाजता.
सोनी मराठी वाहिनीवर…#कोणहोणारकरोडपती । #KonHonaarCrorepati #मागेनाहीराहायचं । #MageNahiRahaycha#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/nQLdEYdqVe

— Sony मराठी (@sonymarathitv) May 22, 2023

TV Comedy Show Maharashtrachi Hasyajatra


Previous Post

अरेरे! माजी मंत्री सिसोदियांशी दिल्ली पोलिसांचे गैरवर्तन… कॉलर पकडून धक्काबुक्की… व्हिडिओ व्हायरल

Next Post

घरी बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; उंटवाडीतील घटना

Next Post
प्रातिनिधिक फोटो

घरी बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; उंटवाडीतील घटना

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, २९ मे २०२३चे राशिभविष्य

May 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २९ मे २०२३

May 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे बर्थडे गिफ्ट

May 28, 2023

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group