नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकीवरून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ तरुणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयितांनाकडून दोन कोयते व १ बजाज पल्सर मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. या दोघांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने गस्ती दरम्यान पाठलाग करून ही कारवाई केली आहे.
संशयित हे दोन तरुण काळ्या रंगाच्या बजाज पल्सरवरून हातात कोयते घेऊन जात होते. जातांना ते मोठमोठ्याने ओरडून दहशत माजवित असतांना पथकाला ते शिवपुरी चौकात दिसले. त्यानंतर या पथकाने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर आकाश प्रल्हाद पवार (१८,रा. गणेश चौक, मयुरी गार्डन, मोरवाडी, दत्तमंदीर, काळे यांच्या गिरणी समोर,नवीन नाशिक), राशिद हारून खान (१९ ,राह. शिवपुरी चौक, पंडीत नगर, नवीन नाशिक) यांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले आहे.
ही कामगिरी दरोडा व शस्त्र विरोधीपथकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळे, अंमलदार विजयकुमार सुर्यवंशी, मोहन देशमुख, संदीप डावरे, महेश खांडबहाले, प्रविण चव्हाण, विशाल जोशी, महेंद्र साळुंखे, सागर बोधले, युवराज गायकवाड, मनिषा कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली