India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिडको गोळीबार प्रकरण…. सिनेस्टाईल पाठलाग… मुख्य सूत्रधारांना नाशिक पोलिसांनी असे केले गजाआड…

India Darpan by India Darpan
April 23, 2023
in क्राईम डायरी
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिनेस्टाईल पाठलाग करुन सिडकोत झालेल्या गोळीबाराचे मुख्यसुत्रधार असलेल्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने नाशिकरोड भागात ही कारवाई केली आहे. या टोळीतील अकरा जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सागर कचरू पवार (२८ रा.गणेशवाडी,पंचवटी) व पवन दत्तात्रेय पुजारी (२३ रा.तारवालानगर,दिंडोरीरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

सिडकोतील बाजीप्रभू चौकात सराईत गुन्हेगार तथा भाजपाचा माथाडी कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष राकेश तुकाराम कोष्टी याच्यावर रविवारी सकाळच्या सुमारास सिनेस्टाईल हल्ला झाला होता. अ‍ॅक्टीव्हावर देवदर्शनासाठी जात असलेल्या कोष्टी याच्यावर पल्सरस्वार त्रिकुटाने भरदिवसा गोळय़ा झाडल्या होत्या. या घटनेत दोन गोळया लागल्याने कोष्टी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅगवार मधून ही घटना घडल्याने पोलिसांनीही तात्काळ चक्र फिरवित नामचिन जया दिवेसह अन्य चौघांना जेरबंद केले होते. यापाठोपाठ युनिट १ च्या पथकाने मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर नजीकच्या बडवाह जि. खरगोन या गावातून सात जणांना ताब्यात घेतले असून दुचाकीवरून गोळया झाडणारा सागर पवारही हाती लागल्याने या गुह्याच्या तपासास गती येणार आहे. ही कारवाई पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,जमादार मंलग गुंजाळ,हवालदार डी.के.पवार,पोलिस नाईक प्रदिप ठाकरे आदींच्या पथकाने केली.

Nashik City Crime Cidco Firing Main Suspect Arrested


Previous Post

ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंचा संयम संपला.. पुन्हा आंदोलन सुरू.. ढसाढसा रडून म्हणाले… लैंगिक छळ होऊनही.. (व्हिडिओ)

Next Post

‘इंडिया दर्पण’च्या बातमीवर शिक्कामोर्तब… यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरला…. महामंडळाकडून घोषणा

Next Post

'इंडिया दर्पण'च्या बातमीवर शिक्कामोर्तब... यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरला.... महामंडळाकडून घोषणा

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group