नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागात राहणाऱ्या आर्किटेक्टच्या घरातून २३ लाखाची रोकड लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंजूश्री समीर राठी (रा. महात्मानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्किटेक असलेल्या राठी कुटूंबियांनी आपल्या व्यवसायातील सुमारे २३ लाखाची रोकड गेल्या महिन्यात स्वयंपाक घरातील लॅफ्टवर असलेल्या डब्यात ठेवली होती. महिनाभराच्या तपासणीत ही रक्कम बेपत्ता झाल्याचे समोर आले असून, कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक येसेकर करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651505014437986305?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651505048118259714?s=20
nashik city crime Architect Home Theft