नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिस कोठडीत असलेल्या संशयिताने अंबड पोलिस स्टेशनच्या शौचालयामधील फरशीच्या साह्याने हाताला कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाला जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यामध्ये हा संशयिताने लॉकअपमध्ये आहे. विशाल संतोष कुराडे (१९, रा. चुंचाळे घरकुल योजना अंबड, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.
कुराडे याच्यासहा पाच ते सहा जणांवर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाणे अंकित एमआयडीसी चिंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल आहे. वाढदिवसाचा केक कापत असताना हा हल्ला करण्यात आला होता.
या प्रकरणात संशयित कुराडे हा पोलीस कोठडीत असताना त्याने पोलीस कोठडीमध्ये असलेल्या शौचालयामधील फरशीच्या साह्याने हाताला कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कुराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.