नाशिक – गेल्या काही दिवासांपासून सातत्याने कोरोना प्रतिबंधक लसीसाठी नाशिककर गैरसोयीचा सामना करीत आहेत. अद्यापही त्यांची गैरसोय कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. उद्या बुधवारी (१४ जुलै) शहरात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होणार असली तरी केवळ ती दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच असणार आहे. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू असणार आहे. तसेच नाशिक शहरातील ज्या नागरिकांचा कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस बाकी असेल त्यांचेच लसीकरण शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी १४ जुलै रोजी इतर कोणत्याही लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
खालील प्रमाणे लसीकरण केंद्र (श. प्रा. आरोग्य केंद्र ) (दि. १४/७/२०२१ करिता)
१ भारत नगर , श.प्रा.आ केंद्र
२ सिन्नर फाटा,श.प्रा.आ .केंद्र
३ तपोवन,श.प्रा. आ.केंद्र
४ रेडक्रॉस, श.प्रा.आ.केंद्र
५ जिजामाता,श.प्रा.आ.केंद्र
६ नाशिक रोड,श.प्रा.आ.केंद्र (खोले मळा)
७ मायको सातपूर,श.प्रा.आ.केंद्र
८ हिरावाडी,श.प्रा.आ.केंद्र
९ वडाळागाव, श.प्रा.आ.केंद्र
१० पिंपळगाव खांब,श.प्रा.आ.केंद्र
११ गंगापूरगाव,श.प्रा.आ.केंद्र
१२ सिडको,श.प्रा.आ.केंद्र
१३ उपनगर,श.प्रा.आ.केंद्र
१४ सुदर्शन कॉलनी (रामवाडी) श.प्रा.आ.केंद्र
१५ स्वामी समर्थ रुग्णालय
१६ एम. एच. बी कॉलनी,श.प्रा.आ.केंद्र
१७ दसक पंचक,श.प्रा.आ.केंद्र
१८ मायको पंचवटी,श.प्रा.आ.केंद्र
१९ मखमलाबाद,श.प्रा.आ.केंद्र
२० अंबड,श.प्रा.आ.केंद्र
२१ कामाटवाडे,श.प्रा.आ.केंद्र
२२ म्हसरूळ,श.प्रा.आ.केंद्र
२३ एस.जी.एम, श.प्रा.आ.केंद्र (बनकर चौक )
२४ वडनेर, श.प्रा.आ.केंद्र
२५ संजीवनगर,श.प्रा.आ.केंद्र
२६ गोरेवाडी,श.प्रा.आ.केंद्र
२७ बजरंगवाडी ,श.प्रा.आ.केंद्र
२८ सिव्हिल,श.प्रा.आ.केंद्र
२९ संत गाडगे महाराज दवाखाना (रंगारवाडा)
—
कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस खालील केंद्रांवर मिळेल
१ इंदिरा गांधी हॉस्पिटल
२ जेडीसी बिटको हॉस्पिटल
३ आएसआयएस हॉस्पिटल, सातपूर
४ समाज कल्याण कार्यालय नासर्डी पूल