नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात सीएनजीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने शहरातील आठही सीएनजी पंप बंद असल्याची स्थिती आहे. यामुळे वाहनधारक वैतागले असून सीएनजी पंप चालकांनाही प्रचंड मोठा आर्थिक फटका बसत आहे.
गेल्या दोन वर्षात नाशिक शहर परिसरात हळहळू एकूण ८ सीएनजी पंप कार्यन्वित झाले आहेत. ते पाहून ग्राहकांचाही सीएनजी वाहने खरेदीकडे कल आहे. परिणामी, गेल्या दीड वर्षात नाशिक शहर परिसरात सीएनजी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आणि आता गेल्या दोन दिवसांपासून नाशकात सीएनजीचा पुरवठाच होत नसल्याचे चित्र आहे.
सीएनजी नसल्याने शहर परिसरातील आठही सीएनजी पंप सध्या बंद आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. त्याशिवाय पंपचालकही हैराण झाले आहेत. हा पुरवठा नक्की कधी सुरळीत होईल, याबाबत काहीही माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत.
नाशिक शहरात सीएनजीचा मोठा तुटवडा
सर्व पेट्रोल पंप बंद pic.twitter.com/3at9rid9Mv— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 19, 2023
Nashik City CNG Supply Pump Closed