नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर परिसरात सेवा देणाऱ्या सिटी लिंक या बस सेवेने एक मोठा निर्णय घेतला आहे. शहराबाहेरील परंतु शिक्षणासाठी नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग विद्यार्थांना देखील करता येणार सिटीलिंक मधून मोफत प्रवास करता येणार आहे.
सर्वसामान्य नाशिककरांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली सिटीलिंक आपल्या प्रवाशांच्या सुखकर, आरामदायी व सुरक्षित प्रवासासाठी नेहमीच प्रवासीभिमुख निर्णय घेत असते. त्याच अनुषंगाने सिटीलिंक ने नाशिक महानगर पालिका हद्दीत राहणार्या व ४० टक्के किंवा ४० टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मुख्य म्हणजे ज्यांनी मोफत प्रवासाचा पास काढलेला आहे अशा दिव्यांगांना आजपासून (१ नोव्हेंबर) मोफत प्रवास करता येणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत अनेक दिव्यांग विद्यार्थी शिकत असल्याने अश्या विद्यार्थांचा देखील सिटीलिंकने सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीबाहेरील असणारे परंतू जे दिव्यांग विद्यार्थी नाशिक महानगरपालिका हद्दीत राहून शिक्षण घेत आहे अश्या दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील आता या मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थांना मोफत प्रवासाचा लाभ घ्यावयाचा आहे अशा दिव्यांग विद्यार्थांनी सिटीलिंक भवन, वीर सावरकर जलतरण समोर, गोल्फ क्लब मैदानाजवळ, त्र्यंबकरोड, नाशिक या मुख्य कार्यालयात आवश्यक कागदपत्र जमा करून मोफत पास काढून घ्यावा, असे आवाहान सिटीलिंक प्रशासनाने केले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यानी या मोफत प्रवासाचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच दिनांक १ नोव्हेंबर पासून ज्या दिव्यांग प्रवाश्यांकडे मोफत पास असेल अश्याच दिव्यांग प्रवाश्यांना सिटीलिंक बसमधून मोफत प्रवास करता येईल. तसेच दिव्यांगाना देण्यात आलेली १/४ सवलत दिनांक १ नोव्हेंबर पासून पूर्णत बंद करण्यात आली असून १ नोव्हेंबर पासून ETM मशीन मधून १/४ सवलतीचे तिकीट निघणार नाही याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी, असे सिटीलिंकने स्पष्ट केले आहे.
5)मोफत पास काढून घ्यावा.
मोफत पास काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-
१) आधारकार्ड
२) बोनफाईड सर्टिफिकेट
३) नाशिक महानगरपालिका हद्दीत राहत असलेला पुरावा
४) दिव्यांग विद्यार्थ्याचा फोटो
५) दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र
तरी नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्या जास्तीत जास्त pic.twitter.com/VLoD9yhz8u— CITILINC | Connecting Nashik (@CitilincNashik) October 31, 2022
Nashik City Bus Decision Students Free Travel