नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात बससेवा देणाऱ्या सिटीलिंकने आता महिलांना मोठा दिलासा दिला आहे. महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यात उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शहरातील तीन मार्गांवर एकूण ८ फेऱ्यांची सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होत आहे. या बससेवेचे मार्ग आणि वेळा खालीलप्रमाणे
गंगापूर गाव ते निमाणी – सकाळी ९ वाजता – बारदान फाटा, सातपूर, सिव्हिल हॉस्पिटल, सीबीएस
निमाणी ते गंगापूर गाव – सायंकाळी ६ वाजता – सीबीएस, सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, बारदान फाटा
अंबड गाव ते निमाणी – सकाळी ९.२५ – सिम्बायोसिस, उत्तमनगर, पवननगर, सीबीएस
निमाणी ते अंबड गाव – सायंकाळी ६ वाजता – सीबीएस, पवननगर, उत्तमनगर, सिम्बायोसिस
नाशिकरोड ते निमाणी – सकाळी ९.१० वाजता – उपनगर, द्वारका, शालिमार
निमाणी ते नाशिकरोड – सकाळी ९.१० वाजता – शालिमार, द्वारका, उपनगर
नाशिकरोड ते निमाणी – सायंकाळी ६.१० वाजता – उपनगर, द्वारका, शालिमार
निमाणी ते नाशिकरोड – सायंकाळी ६.१० वाजता – शालिमार, द्वारका, उपनगर
https://twitter.com/CitilincNashik/status/1519953191089377280?s=20&t=j87k-LZ8Yk9steGubdKGZg