नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात बससेवा देणाऱ्या सिटीलिंकने आता महिलांना मोठा दिलासा दिला आहे. महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यात उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शहरातील तीन मार्गांवर एकूण ८ फेऱ्यांची सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होत आहे. या बससेवेचे मार्ग आणि वेळा खालीलप्रमाणे
गंगापूर गाव ते निमाणी – सकाळी ९ वाजता – बारदान फाटा, सातपूर, सिव्हिल हॉस्पिटल, सीबीएस
निमाणी ते गंगापूर गाव – सायंकाळी ६ वाजता – सीबीएस, सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, बारदान फाटा
अंबड गाव ते निमाणी – सकाळी ९.२५ – सिम्बायोसिस, उत्तमनगर, पवननगर, सीबीएस
निमाणी ते अंबड गाव – सायंकाळी ६ वाजता – सीबीएस, पवननगर, उत्तमनगर, सिम्बायोसिस
नाशिकरोड ते निमाणी – सकाळी ९.१० वाजता – उपनगर, द्वारका, शालिमार
निमाणी ते नाशिकरोड – सकाळी ९.१० वाजता – शालिमार, द्वारका, उपनगर
नाशिकरोड ते निमाणी – सायंकाळी ६.१० वाजता – उपनगर, द्वारका, शालिमार
निमाणी ते नाशिकरोड – सायंकाळी ६.१० वाजता – शालिमार, द्वारका, उपनगर
प्रवासी महिलांसाठी खुशखबर! सिटीलिंकने सुरू केली आता खास महिलांसाठी स्वतंत्र बससेवा. स्वतंत्र बस सेवेमुळे महिला वर्गात सुखकर, आरामदायी प्रवासाबरोबर आता महिलांची सुरक्षितता ही जपली जाणार.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच Nashik City Bus ॲप डाऊनलोड करा.
लिंकhttps://t.co/PZ6vW7uc2W pic.twitter.com/vqwlEHYvXT— CITILINC | Connecting Nashik (@CitilincNashik) April 29, 2022