चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील शेतकरी संजय पगार यांनी सरपंच सागर पगार यांना मित्राच्या विहिरीसाठी सही देत नसल्याच्या कारणावरून फेसबुक वरती पोस्ट टाकली होती. त्याचा राग मनात घेऊन सरपंच सागर पगार यांच्यासह पंधरा-वीस गुंडांनी संजय पगार यांच्या दुकानात घुसून तोडफोड करत त्यांना मारहाण केली.
या मारहाणीनंतर संजय पगार यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता केंद्रात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना संजय पगार यांच्या दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सरपंच यांनी केलेल्या मारहाणीचा आणि गुंडगिरीचा संपूर्ण गाव तीव्र निषेध करत आहे.
? फेसबुकवर पोस्ट टाकल्याचा राग *सरपंचाची दुकानदाराला बेदम मारहाण* (बघा व्हिडिओ)
https://t.co/gX4Dw8QPfQ#indiadarpanlive #nashik #chandwad #facebook #post #sarpanch #beat #shopkeeper #video pic.twitter.com/BAa8iJVTV9— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 17, 2023
Nashik Chandwad Facebook Post Sarpanch Beat Shopkeeper Video