नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्मयोगीनगर, बाजीरावनगरसह संपूर्ण प्रभागात पंचवीस वर्षे जुनी असलेली पाईपलाईन बदलण्यास आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी नव्याने टाकण्यास सुरुवात झाली आहे, यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश आले असून, महापालिका प्रशासनाचे आभार मानले जात आहे.
नाशिकच्या गोविंदनगर, तिडकेनगर, जुने सिडको, खोडे मळा, बडदेनगर, सद्गुरूनगर, तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क, खोडे मळा आदी भाग जुना प्रभाग क्रमांक २४ मध्ये, तर नवीन रचनेतील प्रभाग ३० मध्ये येतो. या भागाचा झपाट्याने विकास होत असून, लोकवस्ती वाढत आहे. पाण्याची गरजही वाढली आहे. येथे नेहमीच पाणीपुरवठा विस्कळीत असतो. या भागातील चोवीस-पंचवीस वर्षे जुनी कुजलेली कमी व्यासाची पाईपलाईन काढून टाकावी, त्याठिकाणी नवीन मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकावी, यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी काही ठिकाणी पाईपलाईन बदलण्यात आली होती. संपूर्ण प्रभागातील जुनी पाईपलाईन बदलावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने एका निवेदनाद्वारे २३ सप्टेंबर २०२१ रोजी केली होती. सततच्या प्रयत्नानंतर या कामाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३२ लाख २४ हजार ९२५ रुपयांची पाईपलाईन टाकण्याची निविदा प्रसिद्ध झाली. पुढील कार्यवाहीनंतर कार्यारंभ आदेश निघाला.
गेल्या काही दिवसांपासून बाजीरावनगर, कर्मयोगीनगर, सद्गुरूनगर भागात पाहणी करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. प्रभागात ज्या-ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे ही पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानले आहे. योग्य कार्यवाही सुरू केल्याबद्दल सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, मनोज वाणी, प्रदीप गोराणे, डॉ. पराग सुपे, नितीन रसाळ, हरिष पाटील, नवलनाथ तांबे, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, डॉ. शशिकांत मोरे, प्रकाश वरखेडे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, ओमप्रकाश शर्मा, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, वैभव कुलकर्णी, दीपक दुट्टे, अशोक पाटील, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, सुनिता उबाळे, मीना टकले, शीतल गवळी, सुलोचना पांडव, रूपाली मुसळे, मिनाक्षी पाटील, बन्सीलाल पाटील, शैलेश महाजन आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.