सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रस्त्यावर ७ कैऱ्या, ७ दगड, हळद, कुंकू… उताऱ्यातील ‘त्या’ कैऱ्यांचा घेतला चक्क आस्वाद… नाशकातील या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा

by India Darpan
मे 18, 2023 | 5:32 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230518 WA0008

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या किंवा आपल्या कुटुंबावरील विघ्न दूर व्हावे किंवा इतरांवर ते विघ्न यावे या किंवा तत्सम हेतूने सात कैऱ्या अन् सात दगडांची रस्त्याच्या कडेला उतारा मांडून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या अज्ञातांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डाव उधळला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कैऱ्या या उताऱ्यासाठी नव्हे तर मानवी खांद्यासाठीच असतात, असा संदेश देत त्याचा चवीने आस्वादही घेतला. तसेच परिसरातील नागरिकांना अशाप्रकारच्या कृती या अंधश्रद्धा असून, त्यास कोणीही बळी पडू नये असा संदेशही दिला.

सातपूर, सोमेश्वर कॉलनी परिसरात चारचाकी पार्क केल्या जात असलेल्या रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी पानांवर सात कैऱ्या अन् दगड ठेवून त्यावर हळद-कुंकु टाकले होते. तसेच तिथे नवैद्यही ठेवण्यात आला होता. मंगळवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हा सर्व प्रकार केला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा प्रकार समोर आला, तेव्हा परिसरातील नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली व घबराट झाली.

चारचाकी पार्कींगच्या जागेवर अशाप्रकारे कोणी पूजा केली असावी?, यामागचा नेमका हेतू काय?, करणीचा तर हा प्रकार नसावा ना? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये विशेषत: महिला वर्गात चर्चिले गेले. काहींनी तर हा ‘ब्लॅक मॅजिक’चा प्रकार असावा असाही संशय व्यक्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे नागरिकांनी याठिकाणी वाहने पार्किंग करणेही टाळले. यासर्व प्रकाराचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, यशदा चांदगुडे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी परिसरातील नागरिकांना बोलावून त्यांचे प्रबोधन केले. अशाप्रकारच्या उताऱ्यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असून, यातून काहीही साध्य होत नसल्याची बाब अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पटवून दिली. तसेच उताऱ्यात मांडलेल्या कैऱ्या धुवून त्याचा आस्वादही घेतला. तसेच नागरिकांनी अशाप्रकारच्या पूजांमुळे घाबरून जावू नये, परिसरात अंधश्रद्धाचा प्रकार घडत असेल तर अंनिसशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान, अशाप्रकारची पूजा करून भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचा परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

यशदाचे कौतुक
अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये लहानग्या यशदाचे मात्र सर्वांनीच कौतुक केले. यशदाने मनात कुठलीही भिती न बाळगता पूजेतील कैऱ्या उचलल्या. तसेच त्यांचा आस्वादही घेतला. अशाप्रकारच्या उताऱ्यामुळे विघ्न दूर होणे किंवा इतरांना त्यापासून ईजा पोहोचणे ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचा संदेशही तिने यावेळी दिला. तिची ही धाडसी वृत्ती कौतुकास्पद ठरली.

Nashik Anis Superstition Mango Taste

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘अशोका बिल्डकॉन’चा नर्मदा नदीवरील आठ मार्गिका पूल उभारणीसाठी गौरव

Next Post

नाशकात उद्यापासून औद्योगिक कुंभमेळा; निमा पॉवर’ प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
IMG 20230518 WA0012 e1684421665758

नाशकात उद्यापासून औद्योगिक कुंभमेळा; निमा पॉवर' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011