India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकहून गोवा, दिल्ली विमानसेवेचे तिकीट बुक करा आणि मिळवा १ हजार रुपयांची सूट

India Darpan by India Darpan
February 20, 2023
in राज्य
0
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताचा सर्वात मोठा ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म आणि भारतीयांचा सर्वाधिक पसंतीचा ट्रॅव्हल पार्टनर इझमायट्रिप डॉटकॉम कंपनीकडून फ्लाइट टिकिट्सचे बुकिंग करून गोवा, पुणे आणि दिल्ली विमानतळांवर लँड होणाऱ्या ग्राहकांसाठी लेव्हो स्पॅलॉनचा विलक्षण हवाहवासा अनुभव मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, जिथे कंपनीचा शिक्का असलेल्या व्हाऊचर्सच्या मोबदल्यात ग्राहकांना आपल्या ब्युटी सर्व्हिसेसवर आकर्षक सवलती मिळू शकणार आहेत. ही व्हाऊचर्स वापरून ग्राहकांना या सेवांवर तब्बल १००० रुपयांची सूट मिळणार आहे.

नाशिकहून सध्या स्पाईसजेट कंपनीची दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा सुरू आहे. तर, १५ मार्चपासून इंडिगो कंपनीची नाशिक-गोवा, नाशिक-नागपूर आणि नाशिक-अहमदाबाद या शहरांसाठी सेवा सुरू होत आहे. त्यामुळे दिल्ली आणि गोवा विमानसेवेचे तिकीट बुक करणाऱ्यांना इझमायट्रिपच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

गोव्यामध्ये लँड होणाऱ्या प्रवाशांना वागाटोर छापोरा रोडवरील डब्ल्यू, गोवा येथे असलेल्या अवे स्पा आणि लेव्हो सॅलॉनमध्ये सौंदर्य आणि दिमाख यांचा स्पर्श अनुभवता येणार आहे. दिल्लीला भेट देणाऱ्या प्रवाशांना पेगॅसस वन, गोल्फ कोर्स रोड, सेक्टर-५३, गुरुग्राम येथील लेव्हो स्पॅलॉनमध्ये ही व्हाऊचर्स वापरता येणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात लँड होणाऱ्या प्रवाशांना पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टीन मधील हेवनली स्पा आणि लेव्हो सॅलॉनमधील तज्ज्ञांच्या मदतीने आपल्या व्यक्तिमत्वाला नवी झळाळी देता येणार आहे.

इझमायट्रिपचे सह-संस्थापक श्री. रिकांत पिट्टी म्हणाले, “या ऑफरमुळे आमच्यासोबत प्रवास करत असलेल्या प्रवाशांना एक ताजातवाना करणारा अनुभव आम्ही देऊ शकणार आहोत. बहुतांश लोकांना सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी गेले असताना अशा विरंगुळ्याच्या गोष्टींची मौज अनुभवणे आवडते आणि त्यांच्यासाठी असा आगळावेगळा अनुभव घेऊन आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.”

लेव्हो सॅलॉनच्या सीईओ आणि सह-संस्थापक श्रीम. प्रणिता बावेजा म्हणाल्या, “प्रवास किती थकवणारा असू शकतो हे आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे आणि ग्राहकांना सर्वात उच्च त-हेची देखभाल पुरविणाऱ्यासाठी आमची ही नवीन ऑफर त्यांना संपूर्ण ताजेतवाने करण्यासाठी व ताणतणाव दूर करण्यासाठी एक आलीशान अनुभव घेऊन आली आहे. हा छान सहयोग म्हणजे माझ्यासाठी एक गौरवाची बाब आहे.”

Nashik Air Service Ticket Booking Offer Discount


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – ही गोष्टच सर्वांत अधिक महत्त्वाची

Next Post

यंदा एल निनोमुळे दुष्काळ पडणार? खरं काय आहे? हवामानतज्ज्ञांना काय वाटतं? घ्या जाणून…

Next Post

यंदा एल निनोमुळे दुष्काळ पडणार? खरं काय आहे? हवामानतज्ज्ञांना काय वाटतं? घ्या जाणून...

ताज्या बातम्या

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्टातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group