India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘इंडिगो’ची नाशिक विमानसेवेबाबत मोठी घोषणा; आता या तारखेपासूनच मिळणार सेवा

India Darpan by India Darpan
January 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विमानसेवेबाबत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. देशातील अत्यंत आघाडीची आणि व्यावसायिकरित्या उत्तम सेवा देणाऱ्या इंडिगो कंपनीने मोठी घोषणा केली आहे. कंपनीकडून येत्या २६ मार्चपासून सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, कंपनीने या सेवेसाठी सर्व तयारी लवकर पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच नाशिककरांना इंडिगोची सेवा आता १५ मार्चपासूनच मिळणार आहे. या सेवेचे बुकींग १ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची चिन्हे आहेत.

इंडिगोचे आगमन
गेल्या तीन वर्षांपासून इंडिगो कंपनीची नाशिकला प्रतिक्षा आहे. आता इंडिगो कंपनीने नाशकात येण्याचे निश्चित केले आहे. इंडिगो कंपनीकडून नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे. इंडिगो कंपनीची सेवा अतिशय व्यावसायिक पातळीवर यशस्वी समजली जाते. त्यांचे आगमन नाशकात होत असल्याने आगामी काळात नाशिक विमानसेवेला मोठा वेग येणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

इंडिगो कंपनीचे संभाव्य वेळापत्रक असे
शहराचे नाव… सुटण्याची वेळ… पोहचण्याची वेळ…
हैदराबाद…सकाळी ७.१०……..सकाळी ९.१० (नाशिक)
नाशिक….सकाळी ९.३०…….सकाळी ११.२० (गोवा)
गोवा…..सकाळी ११.४०….दुपारी १.३५ (नाशिक)
नाशिक….दुपारी १३.५५….दुपारी ३.२० (अहमदाबाद)
अहमदाबाद….दुपारी ३.४०….सायंकाळी ५.०५ (नाशिक)
नाशिक….सायंकाळी ५.२५….रात्री ७.१५ (नागपूर)
नागपूर…..रात्री ७.३५…..रात्री ८.२५ (नाशिक)
नाशिक….रात्री ८.४५…. रात्री ११.४० (हैदराबाद)

मार्चपासून सेवा
विमानसेवेच्या येत्या उन्हाळी वेळापत्रकापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून नाशिकहून ४ नव्या शहरांसाठी सेवा सुरू करण्याची घोषणा स्पाईसजेट आणि इंडिगो कंपनीने केली आहे. त्यात अहमदाबाद, बंगळुरू, नागपूर आणि गोवा या चार शहरांचा समावेश आहे. सद्यस्थितीत या कंपनीची नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-नवी दिल्ली या दोन शहरांसाठीची सेवा सुरू आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता या कंपनीने आणखी तीन शहरांसाठी सेवा सुरू करण्याचे पत्र हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझर येथील नाशिक विमानतळ प्रशासनाला दिले आहे. विमानसेवा सुरू होण्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. तसेच, विमानतळाच्या ठिकाणी विविध सुविधा आणि सहकार्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

हैदराबाद, अहमदाबादसाठी दोन सेवा
एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिकमधून अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव या तीन शहरांसाठी सेवा सुरू होती. मात्र, उडान योजनेची मुदत संपल्याचे कारण सांगत या कंपनीने अचानक सेवा बंद केली. त्याचा मोठा परिणाम झाला. मात्र, स्पाईसजेट कंपनीची दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांसाठीची सेवा सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला. आता स्पाईसजेट आणखी तीन शहरांसाठी सेवा सुरू करणार असल्याने एकूण ५ शहरांसाठी सेवा सुरू होणार आहे.  येत्या २६ मार्च ते २८ ऑक्टोबर या काळात स्पाईसजेट ही कंपनी तब्बल आठवडाभर म्हणजेच सातही दिवस नाशिकहून विमानसेवा देण्यास इच्छुक आहे. स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन्ही कंपन्या हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा देणार आहेत. नव्या वर्षात नाशिकची विमानसेवा अधित गतीमान होईल, अशी अपेक्षा पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ दत्ता भालेराव यांनी व्यक्त केली आहे.

स्पाईसजेट कंपनीचे संभाव्य वेळापत्रक असे
शहराचे नाव… सुटण्याची वेळ… पोहचण्याची वेळ…
नवी दिल्ली…दुपारी १२.३५……..दुपारी २.४० (नाशिक)
नाशिक….दुपारी २.५०…….दुपारी ४.४० (नवी दिल्ली)
हैदराबाद…..सकाळी ६.२०….सकाळी ७.५५ (नाशिक)
नाशिक….सकाळी ८.२०….सकाळी ९.५५ (हैदराबाद)
बंगळुरू….सकाळी ७.५५….सकाळी १०.०५ (नाशिक)
नाशिक….सकाळी १०.२५….दुपारी १२.०० (अहमदाबाद)
अहमदाबाद…..दुपारी १२.३०…..दुपारी २.०५ (गोवा)
गोवा….रात्री ४.३०…. रात्री ५.४० (नाशिक)
नाशिक….रात्री ८.००….रात्री ८.१० (बंगळुरू)

Nashik Air Service New Year Gift New Cities Connection
Flight Indigo SpiceJet Ozar Ojhar Civil Aviation Goa
Bengaluru Hyderabad Goa Nagpur New Delhi Ahmedabad


Previous Post

चिंताजनक! आता IBMचीही मोठी घोषणा; तब्बल ३९०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

Next Post

नंदुरबार जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढ्यात असा आहे सहभाग; जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Next Post

नंदुरबार जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढ्यात असा आहे सहभाग; जाणून घ्या संपूर्ण इतिहास

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group