नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विमानसेवेबाबत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. नाशिकहून आता गोवा अवघ्या दोन तासात गाठता येणार आहे. ते सुद्धा अवघ्या ३ हजार रुपयांच्या तिकीटमध्येच. देशातील अत्यंत आघाडीची आणि व्यावसायिकरित्या उत्तम सेवा देणाऱ्या इंडिगो कंपनीने नाशिक विमानसेवेचे बुकींग सुरू केले आहे. येत्या १५ मार्चपासून कंपनीच्यावतीने गोवा, अहमदाबाद आणि नागपूर या तीन शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे.
इंडिगोचे आगमन
गेल्या तीन वर्षांपासून इंडिगो कंपनीची नाशिकला प्रतिक्षा आहे. आता इंडिगो कंपनीने नाशकात येण्याचे निश्चित केले आहे. इंडिगो कंपनीकडून नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे. इंडिगो कंपनीची सेवा अतिशय व्यावसायिक पातळीवर यशस्वी समजली जाते. त्यांचे आगमन नाशकात होत असल्याने आगामी काळात नाशिक विमानसेवेला मोठा वेग येणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Introducing daily flights to Nashik from Ahmedabad, Nagpur and North Goa W.E.F. 15th March, 2023. Fares starting at ₹2,736. Book now https://t.co/FaTguuTbPi. #goIndiGo #Nashik #NewDestination #IndiaAt75 pic.twitter.com/AL9FAmOJrd
— IndiGo (@IndiGo6E) February 6, 2023
विमानसेवेचे वेळापत्र पाहण्यासाठी आणि तिकीट बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.goindigo.in/
सद्यस्थितीत या कंपनीची नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-नवी दिल्ली या दोन शहरांसाठीची सेवा सुरू आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता या कंपनीने आणखी तीन शहरांसाठी सेवा सुरू करण्याचे पत्र हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझर येथील नाशिक विमानतळ प्रशासनाला दिले आहे. विमानसेवा सुरू होण्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. तसेच, विमानतळाच्या ठिकाणी विविध सुविधा आणि सहकार्यासाठीही पुढाकार घेतला आहे.
Nashik Air Service Indigo Ticket Booking Started
Nashik Air Service New Year Gift New Cities Connection
Flight Indigo SpiceJet Ozar Ojhar Civil Aviation Goa
Bengaluru Hyderabad Goa Nagpur New Delhi Ahmedabad