नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १० हजाराची लाच घेताना सापडलेली लाचखोर हिवताप अधिकारी वैशाली पाटीलकडे सोन्याचे घबाड सापडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पाटीलची सध्या कसून चौकशी सुरू आहे. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने आता तिचा आणखी कसून तपास केला जाणार आहे.
आपल्याच सहकाऱ्याकडून १० हजार रुपये लाच घेताना श्रीमती वैशाली दगडू पाटील (वय- ४९ वर्ष, जिल्हा हिवताप अधिकारी), श्री. संजय रामू राव, (वय ४६ वर्ष, व्यवसाय- आरोग्य सेवक) आणि श्री. कैलास गंगाधर शिंदे (वय ४७ वर्ष, आरोग्य सेवक) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.
श्रीमती वैशाली दगडू पाटील हिच्या गंगापूररोड येथील स्टेटस रेसिडेन्सी या बंगल्याचीही एसीबीने झडती घेतली आहे. पाटील हिच्या बँक लॉकर, विविध बँक खाती याची तपास मोहिम सुरू आहे. पाटील हिच्या बॅक लाॅकरची झडती घेतली असता, बॅक लाॅकरमध्ये ७१ तोळे सापडले आहे. तर, तिच्या बंगल्यात १० तोळे सोने सापडले आहे. म्हणजेच एकूण ८१ तोळे सोने तिच्याकडे आढळून आले आहे. याशिवाय तिची अन्य संपत्ती आणि मालमत्ता यांचाही एसीबीकडून शोध सुरू आहे.
Nashik ACB Raid Maleria Officer Vaishali Patil Gold