नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे हा तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना सापडल्याने सहकार आणि अन्य क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. खरे याने स्वतःच्या आलिशान फ्लॅटमध्ये ही लाच घेतली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात तो सापडला. या कारवाईनंतर खरे याच्या घरी एसीबीला मोठा घबाड गवसले आहे.
जिल्हा सहकार उपनिबंधक सतीश खरे यांना काल रात्री तीस लाख रुपये लाच स्विकारताना त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली. खरे यांच्या घराच्या झडतीत १७ लाखांची रोकड व ४५ तोळे सोने यांसह अनेक संशयास्पद वस्तु सापडल्याचे बोलले जाते. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिकचे जिल्हा सहकार उपनिबंधक सतीश खरे याच्या कॉलेजरोड येथील आलिशान फ्लॅटमध्ये एसीबीने तपासणी केली. त्यात पोलिसांना १७ लाखांचे रोकड आणि ४५ तोळे सोने तसेच विविध संशयास्पद साहित्य सापडल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार संचालका विरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी (ता.१५) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई कॉलेज रोडवरील खरे जयांच्या निवासस्थानी केली. लाचखोर खरे याच्यासह खासगी व्यक्तिलाही पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहेसतीश भाऊराव खरे (५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१, रा. आई हाईट्स, कॉलेज रोड), खासगी व्यक्ती शैलेश सुमातीलाल साभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट साभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते.
त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे व त्यांच्या साथीदारास पकडत अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.
येथे करा तक्रार
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*
Nashik ACB Raid DDR Satish More Trap Bribe Home Wealth