नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेत अजूनही लाचखोरीची कीड कायम असल्याचे दिसून येत आहे. नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक राजू देवराम निरभवणे आणि सफाई कामगारांचा मुकादम बाळू दशरथ जाधव या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेला सापळ्यात हे दोघे अडकले आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षक निरभवणे आणि मुकादम जाधव या दोघांनी ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. नेमून दिलेले काम न करता हजेरी मस्टरवर सही करण्याचे आणि उशीर झाल्यास खाडे न पकडण्याच्या मोबदल्यात ही लाच मागितली होती. अखेर तडजोडी अंती ५ हजार रुपयांची लाच निश्चित झाली. यानंतर एसीबीकडे तक्रार आली. अखेर एसीबीने सापळा रचला. देवळाली गावातील यशवंत मंडई येथे निरीक्षक निरभवणे आणि मुकादम जाधव हे दोघे ५ हजार रुपयाची लाच घेताना रंहेगाथ पकडले गेले. आता या प्रकरणी एसीबीने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. अधिक तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी एसीबीच्या १०६४ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Nashik ACB Raid Corruption Bribe NMC
Municipal Corporation