रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लाचखोर तहसिलदार बहिरमकडे सापडले एवढे घबाड… नाशिक एसीबीचा कसून तपास…

ऑगस्ट 6, 2023 | 1:52 pm
in संमिश्र वार्ता
0
Naresh Bahiram1 e1691310089198


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल सप्ताह सुरू असतानाच नाशिकचा लाचखोर तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम हा तब्बल १५ लाखाची लाच घेतांना रंगेहात सापडला आहे. त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर होते. आणि त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात बहिरम अडकला आहे. त्यामुळे त्याची राज्यभरात चर्चा होत आहे. लाचखोर बहिरमला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बहिरम याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, एसीबीच्या पथकाने लाचखोर बहिरमच्या घराची झाडाझडती घेतली आहे. बहिरम हा फ्लॅट नंबर ६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर येथे राहतो. त्याचा हा फ्लॅट आलिशान आहे. याच घराची झाडाझडती घेतली असता एसीबीच्या पथकाला मोठे घबाड मिळाले आहे.

असे अडकले जाळ्यात
राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरुम उत्खनन केले जात आहे. यामुळे नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० दंडाची नोटिस तहसील कार्यालयाने जागा मालकास दिली. या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमीन मालकाने सांगितले. याबाबत पडताळणी करणे कामी लाचखोर बहिरम याने जमीन मालकाला त्याच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले. परंतु जमीन मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी एका व्यक्तीला तेथे पाठवले. ती व्यक्ती लाचखोर बहिरम यास स्थळ निरीक्षण वेळी भेटली. त्यावेळी लाचखोर बहिरमने १५ लाख रुपयांची लाच मागितली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम लाच म्हणून स्वीकारली.

सापडले एवढे घबाड
तब्बल १५ लाखाची लाच घेतांना रंगेहात सापडलेला नाशिकचा तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम याच्या घरात ४० तोळे सोने सापडले आहे. या सोन्याची बाजारातील किंमत २४ लाख ४८ हजार रुपये एवढी आहे. तसेच, त्याच्या घरामध्ये ४ लाख ८० हजार रुपयांची रोकडही सापडली आहे. प्रथमदर्शनी मिळालेले हे घबाड आहे. आता त्याचे बँक खाते, बँक लॉकर, अन्य स्थावर मालमत्ता या सर्वांचीच झडती एसीबीकडून घेतली जाणार आहे. न्यायालयाने कोठडी सुनावताच एसीबीच्या पथकाकडून आणखी आक्रमकपणे तपास केला जाणार आहे.

nashik acb raid bribe corruption tehsildar naresh bahiram cash gold
revenue property anti corruption

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे, हे पहायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा…

Next Post

कराटे प्रशिक्षकाचा तरुणीवर अत्याचार… दोन वेळा गर्भपातही… संभाजीनगरमधील घटना

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

कराटे प्रशिक्षकाचा तरुणीवर अत्याचार... दोन वेळा गर्भपातही... संभाजीनगरमधील घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011