नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील ग्रामसेवक हंसराज श्रावण बंजाराला पाच हजाराची लाच स्विकारतांना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. रमाई घरकुल आवास योजनेसाठी प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करून घरकुलाची मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून ही रक्कम स्विकारतांना एसीबीने ही कारवाई केली.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाचे रमाई घरकुल आवास योजनेसाठी प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करून घरकुलाची मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तसेच यापुढेही नमुद घरकुलासाठी शासनाकडून मिळणाऱ्या रकमेचे हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर लवकर जमा करण्यासाठी पाच हजार रुपये पंच साक्षीदारासमक्ष लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम पाच हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी – १) श्री. हंसराज श्रावण बंजारा, वय-52 वर्ष,
व्यवसाय- ग्रामसेवक, वर्ग 3, नेमणूक ग्रामपंचायत कार्यालय अधरवड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक.
लाचेची मागणी- 5000/- रुपये.
लाच स्विकारली-* 5000/- रुपये.
हस्तगत रक्कम- 5000/-रुपये.
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांच्या भावाचे रमाई घरकुल आवास योजनेसाठी प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करून घरकुलाची मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तसेच यापुढेही नमुद घरकुलासाठी शासनाकडून मिळणाऱ्या रकमेचे हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर लवकर जमा करण्यासाठी 5000/- रुपये पंच साक्षीदारासमक्ष लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम 5000/- रुपये पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी-
मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक. 9921252549
*सापळा पथक
पो.हवा. पंकज पळशीकर
पो.ना. प्रवीण महाजन
पो.ना.प्रभाकर गवळी
पो.ना. नितिन कराड
चालक परशुराम जाधव सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नाशिक
Nashik ACB Raid Bribe Corruption Gramsevak