शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या एबीबी कंपनीला मिळाले हे प्लॅटिनम प्रमाणपत्र; हा सन्मान मिळविणारी पहिलीच कंपनी

by Gautam Sancheti
जानेवारी 11, 2023 | 4:32 pm
in स्थानिक बातम्या
0
Nashik ABB

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एबीबी इंडियाचा ४४ वर्षे जुना प्लांट इंडियन ग्रीन बिलिडिंग कौन्सिल (IGBC) कडून ग्रीन फॅक्टरी बिल्डिंग प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळविणारा नाशिक मधील सुमारे १०००० उद्योगांपैकी पहिला प्लांट बनला आहे. प्लॅटिनम प्रमाणपत्र देऊन IGBC ने प्लांट मध्ये केलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचा सन्मानच केला आहे.

म्हणून मिळाला सन्मान
मुख्यतः पाण्याचा वापर ३०% नि कमी करणे, प्लांट साठी लागणारी १००% ऊर्जा रिनूएबल पद्धतीने निर्मित करणे यातील ३०% ऊर्जा ऑनसाईट सोलर सिस्टीम ने निर्माण होते ज्या योगे २८% ऊर्जेची बचत साध्य झाली आहे.१२ एकर जागेत जागो जागी एबीबी द्वारेच निर्मित अत्याधुनिक आर्टीफिशीअल बिल्डिंग व ऊर्जा देखरेख यंत्रणांचा वापर करून ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे इत्यादी चा समावेश होता.
या सोबतच CFC मुक्त एअर कंडिशनर चा वापर, सुमारे ७५% नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशन चा सर्व ठिकाणी पुरेपूर उपयोग, पावसाचे १००% पाणी साठवू शकेल अशी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम, अंतर्गत सांड-पाणी प्रक्रिया केंद्र, उष्णता रोधक छताचा वापर तसेच गुड्स आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी शक्य तेथे इलेकट्रीक वाहनांचा वापर अश्या उपाययोजनांचा हातभार हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरला. नुकताच हा प्लांट CII द्वारे “सिंगल यूज प्लास्टिक फ्री ” म्हणून देखील प्रमाणित करण्यात आला आहे

१९७८पासून प्लांट
निर्मितीच्या दैनंदिन कामकाजात अडथळा न आणता उपलब्ध मर्यादित जागा आणि साधन सामुग्री चा वापर करून ग्रीन आणि सस्टेनेबल प्लांट बनविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना कार्यान्वित करण्या साठी अनेक आव्हानांवर मात करावी लागली. सदर प्लांट हा नाशिक औद्योगिक वसाहती मध्ये सन १९७८ पासून कार्यरत असून या प्लांट मध्ये १५ हुन अधिक प्रॉडक्ट लाईन्स द्वारे उत्पादित माल संपूर्ण भारत तसेच जगातील सुमारे १२० हुन अधिक देशांमध्ये निर्यात केला जातो.

एबीबीचे ध्येय
या मानांकना बाबत बोलताना एबीबी इलेक्ट्रिफिकेशन विभागाचे चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री गणेश कोठावदे म्हणाले की, “जागतिक स्तरावर उद्योग क्षेत्र हा ऊर्जेचा प्रमुख वापरकर्ता आहे ज्या मधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते आणि म्हणून उत्पादन क्षेत्रात हरित आणि शाश्वत ऊर्जा कार्यक्षम उत्पादन सुविधा महत्वाच्या आहेत. या सर्टिफिकेशन द्वारे आम्हाला आमचे ग्राहक आणि इतर भागधारक यांच्याबरोबर पर्यावरणपूरक उपक्रमांनमध्ये भागीदार होता आले याचा अभिमान वाटतो. हे मानांकन मिळवणे हे कार्बन नुट्रेलिटी साध्य करणे या एबीबी च्या ध्येयाशी संलग्न आहे.”

सर्वोच्च मानांकन
प्लॅटिनम हे IGBC कडून दिले जाणारे सर्वोच्च मानांकन आहे, जे डिझाईन आणि विविध पर्यावरणीय श्रेणींमध्ये नाविन्यपूर्ण साईट चे मुल्याकंन करते. एबीबी इंडिया च्या प्लांट १ ला हि मान्यता त्यांच्या विद्यमान पायाभूत सुविधाना शाश्वत आणि पर्यावरण कार्यक्षम बनविण्याच्या प्रयत्नांसाठी मिळाली आहे. आपल्या जागतिक २०३० सस्टेनेबिलिटी धोरणा सह एबीबी सामाजिक स्तरावर कार्बन चे उत्सर्जन कमी करण्यासाठी सक्रिय पणे कार्यरत आहे. एबीबी आपल्या सर्व आस्थापनांमधून प्रभावी वेस्ट मानजमेंट मधून “शून्य टक्के कचरा निर्मिती ” चे लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.

ABB (ABBN: SIX Swiss Ex) ही आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे. अधिक उत्पादनक्षम, शाश्वत भविष्यकाळ साध्य करण्यासाठी समाज व उद्योगाच्या रूपांतरणाला बळ देण्याचे काम ही कंपनी करते. इलेक्ट्रिफिकेशन, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि मोशन पोर्टफोलिओ यांना सॉफ्टवेअर जोडून ABB कामगिरी आणखी उंचावण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाच्या सीमा विस्तारते. १३० वर्षांहून अधिक सर्वोत्कृष्टतेचा इतिहास ABB च्या पाठीशी आहे. १०० हून अधिक देशांतील जवळपास १०५,००० कर्मचारी ABBचा हा यशस्वी वारसा पुढे घेऊन जात आहेत. www.abb.com.

ABBची इलेक्ट्रिफिकेशन बिझनेस एरिया ही २०० हून अधिक मॅन्‍युफॅक्‍चुरिंग साइट्सच्‍या माध्‍यमातून १००हून अधिक देशांमध्‍ये कार्यरत असलेली इलेक्ट्रिकल उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍समधील जागतिक अग्रणी कंपनी आहे. आमचे ५५,००० हून अधिक कर्मचारी सुरक्षित, स्‍मार्ट व शाश्‍वत इलेक्ट्रिफिकेशन देण्‍याप्रती समर्पित आहेत. ABB AbilityTM सक्षम डिजिटल सोल्‍यूशन्‍सला प्राधान्‍य देण्‍यासोबत आमचा पोर्टफोलिओ संरक्षण करतो, कनेक्‍ट होतो आणि युटिलिटीज, इंडस्‍ट्री, इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर व परिवहनासाठी स्‍मार्टर इलेक्ट्रिसिटी वितरणाकरिता रिन्‍यूएबल्‍स व एनर्जी स्‍टोरेजच्‍या एकीकरणासह इलेक्ट्रिकल एनर्जीच्‍या प्रवाहाला सानुकूल करते.

Nashik ABB Plant Wins IGBC Platinum certification for sustainability and eco-efficiency

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमजी मोटरने सादर केल्या या दोन इलेक्ट्रिक कार; अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये

Next Post

नाशिकरोड पोलीसांची कारवाई; ४ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या १३ मोटरसायकल जप्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
crime diary

नाशिकरोड पोलीसांची कारवाई; ४ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या १३ मोटरसायकल जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011