नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पीएम श्री स्कूल्स उपक्रमाची घोषणा केली आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी पीएम स्कूल्स (PM Schools for Rising India) या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरात केंद्र सरकार/राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 14,500 हून अधिक शाळा अद्ययावत आणि विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य करणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची सर्व उद्दिष्टे पीएम श्री स्कूल्स मध्ये दिसून येतील आणि या शाळा शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे आदर्श उदाहरण तसेच आसपासच्या भागातील शाळांना मार्गदर्शक म्हणून काम करतील. गुणवत्तापूर्ण अध्यापन, अध्ययन आणि संज्ञानात्मक विकास हे या शाळांचे मुख्य उद्देश असतील, त्यासोबतच सर्वंकष आणि चौफेर गुणवत्ता असलेले तसेच 21 व्या शतकातील महत्वाची कौशल्ये आत्मसात केलेले व्यक्ती निर्माण करतील.
या शाळांमध्ये अध्यापनशास्त्र प्रयोगात्मक, सर्वंकष, एकीकृत, खेळ/खेळणी आधारीत (विशेषतः पायाभरणीच्या वर्षांत), चौकसपणा वाढविणारे, शोधांवर भर देणारे, विद्यार्थी केंद्रित, चर्चात्मक, लवचिक आणि आनंददायी असेल. प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक परिणामावर विशेष लक्ष दिले जाईल. प्रत्येक पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी संकल्पनात्मक समज आणि आयुष्यातील प्रसंगांत ज्ञानाचा वापर आणि प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता यावर आधारित असेल.
या शाळांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा असतील, ज्यात प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये, खेळाचे साहित्य, कला दालन यांचा समावेश असेल आणि हे सर्वसमावेशक तसेच सर्वांसाठी खुले असेल. या शाळांमध्ये जल संवर्धन, कचऱ्याचा पुनर्वापर, विजेची बचत करणाऱ्या पायाभूत सुविधा आणि अभ्यासक्रमात नैसर्गिक जीवनपद्धतीचे एकत्रीकरण या सारख्या सुविधा तयार करून हरित शाळा म्हणून विकसित केल्या जातील.
या शाळा आपल्या संबंधित भागात नेतृत्वाची भूमिका पार पडतील आणि शाळेत समान, सर्वसमावेशक आणि आनंदी वातावरणात दर्जेदार शिक्षण दिले जाईल. यात वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी, बहुभाषक गरजा आणि मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमता यांचा विचार केला जाईल आणि त्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टीकोनानुसार मुलांना या शिक्षण पद्धतीत स्वतःहून अध्ययन आणि सक्रिय सहभाग घ्यायला प्रोत्साहन दिले जाईल.
राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पीएम श्री स्कूल्स योजनेची घोषणा केली आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी पीएम स्कूल्स (PM Schools for Rising India) या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील 14,500 पेक्षा जास्त शाळा अद्ययावत आणि विकसित केल्या जाणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची सर्व उद्दिष्टे पीएम श्री स्कूल्स मध्ये दिसून येतील आणि या शाळा शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे आदर्श उदाहरण तसेच आसपासच्या भागातील शाळांना मार्गदर्शक म्हणून काम करतील. गुणवत्तापूर्ण अध्यापन, अध्ययन आणि संज्ञानात्मक विकास हे या शाळांचे मुख्य उद्देश असतील, त्यासोबतच सर्वंकष आणि चौफेर गुणवत्ता असलेले तसेच 21 व्या शतकातील महत्वाची कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्ती निर्माण केल्या जातील.
ह्या PM-SHRI शाळांमध्ये अध्ययन-अध्यापनासाठी आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वंकष पद्धती वापरल्या जातील. संशोधन प्रणित, अध्ययनकेंद्री अशी ही शिक्षणपद्धती असेल. या शाळा, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या आदर्श शाळा ठरतील, अशा मला विश्वास आहे, अशी भावना पंतप्रधानांनी हि घोषणा करतांना व्यक्त केली.
पंतप्रधानांनी ट्वीट मालिकेतून या योजनेविषयी माहिती दिली. आज #TeachersDay च्या निमित्ताने मला एका नवीन उपक्रमाची घोषणा करतांना अतिशय आनंद होत आहे. -प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) या योजनेअंतर्गत, देशातील 14,500 शाळा विकसित आणि अद्ययावत केल्या जाणार आहेत. ह्या शाळा आदर्श शाळा ठरतील आणि त्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे संपूर्ण उद्दिष्ट त्यातून साध्य केले जाऊ शकेल.”
“ह्या PM-SHRI शाळांमध्ये शिक्षण अध्ययनासाठी आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वंकष पद्धती वापरल्या जातील. संशोधन प्रणित, अध्ययनकेंद्री अशी ही शिक्षणपद्धती असेल. तसेच या शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, जसे की अद्ययावत तंत्रज्ञान,स्मार्ट वर्गखोल्या, क्रीडा सुविधा आणि इतर अनेक सुविधांवर भर दिला जाईल.” “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने गेल्या काही काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवले आहेत. मला खात्री आहे, पीएम- श्री (PM-SHRI) शाळा देखील, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना असे शिक्षण देऊन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठे योगदान देतील.”
https://twitter.com/narendramodi/status/1566776240518098944?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1566776240518098944%7Ctwgr%5E4fcc7e30ce6a6bd6f1f3c91d1cd76da0eeef5423%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.pib.gov.in%2FPressreleaseshare.aspx%3FPRID%3D1856952
Narendra Modi Launch PM Shree Scheme