नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आई-बाबांनी एखादी वस्तू घेऊन दिली नाही म्हणून दहा वर्षाच्या मुलांनी किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आजवर आपण बघतोय. मोबाईल आल्यापासून तर या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील नवापूरमध्ये मात्र एका विचित्र कारणाने आत्महत्येचा प्रकार घडला आहे.
वडिलांचा नकार
येथील नवापूरमध्ये तीनटेंभा भागात राहणारा सावंत सय्यद गावीत या तरुणाने वडिलांना मोटारसायकल घेऊन देण्याची मागणी केली. त्यात काहीच गैर नाही. अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. सावंतचे लग्न झालेले आहे. त्याची पत्नी रोशनी हिलाही मोटारसायकल मिळावी ही अपेक्षा होती. पण वडिलांनी नकार दिला.
रागाच्या भरात
बरेच दिवस सावंत आपल्या वडिलांच्या मागे मोटारसायकलीसाठी लागला होता. पण ते घेऊनच देत नाहीत म्हणून सावंत आणि त्याची पत्नी रोशनी यांनी रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. पती-पत्नीने रेल्वे रुळावर आत्महत्या केली. आपल्या मुलासह सुनेने आत्महत्या केल्याची बाब सावंतचे वडील सय्यद गावित यांच्यासाठी धक्कादायक होती. त्यांना हे सहन झाले नाही, त्यामुळे त्यांनीही रेल्वे रुळावर आत्महत्या केली.
गावात हळहळ
खरे तर बाईक मागणे हे फार छोटे कारण होते. या कारणासाठी एका विवाहित दाम्पत्याने आत्महत्या करावी, हे फार दुर्दैवी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे आले आणि त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली. एकाच कुटुंबातील तिघांनी एका विचित्र कारणासाठी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
खरे कारण काय?
मुलाने बाईकमागितली आणि वडिलांनी नाही म्हटले, यासाठी बायकोसोबत आत्महत्या करण्याचा निर्णय त्याने का घेतला, असा प्रश्न निर्माण होत आहे. एका मोटारसायकलसाठी लग्न झालेला मॅच्युअर तरुण आत्महत्या का करेल आणि करायचीच असेल तर तो पत्नीला यामध्ये का ढकलेल, असे प्रश्न पडल्यामुळे खरे कारण नेमके काय आहे, याचाही तपास पोलिस करीत आहेत.
Nandurbar Navapur Family 3 members Suicide