नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील पंचायत समितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लावलेला सापळा यशस्वी ठरला आहे. त्यामुळे दोन लाचखोर रंगेहात सापडले आहेत. दादाभाई फुला पानपाटील (वय ५४, कनिष्ठ सहाय्यक, ग्रामपंचायत विभाग,पंचायत समिती, नंदुरबार) आणि सुखदेव भुरसिंग वाघ (वय ४३ वर्ष, कनिष्ठ सहाय्यक, ग्रामपंचायत विभाग, पंचायत समिती, नंदुरबार) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. या दोघांनी ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
सातारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची नंदुरबार पंचायत समितीत आंतरजिल्हा बदली झाली. त्यानंतर त्याचे पगारवाढ (जुलै-2021 ते मे-2023)व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरीत हप्ते काढून बिल मंजूर करावयाचे होते. त्यासाठी लाचखोर पानपाटील याने ७ हजार रुपये लाचेची मागणी केली. तर लाचखोर वाघ याने १ ते २ हजार रूपये अशी मोघम स्वरूपात लाचेची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सापळा कारवाई दरम्यान पानपाटील याने आज पंचायत समिती, नंदुरबार आवारातील डाव्या बाजूस असलेल्या वाहन पार्किंग जवळील लोखंडी गेट जवळ ही लाच स्वीकारली. त्यामुळे तो रंगेहात सापडला. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पर्यवेक्षण अधिकारी:-
श्री राकेश आ. चौधरी, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार मो. नं.9823319220
सापळा अधिकारी:-
श्री समाधान महादू वाघ पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार,मो. नं.8888805100
सापळा कार्यवाही पथक:-
पोहवा/विजय ठाकरे, पोना/देवराम गावित, पोना/संदीप नावाडेकर, पोना/अमोल मराठे व पोना/मनोज अहिरे सर्व नेम. ला.प्र.वि. नंदुरबार.
सापळा मदत पथक:-*
माधवी एस.वाघ, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.
पोहवा/विलास पाटील व मपोना/ज्योती पाटील सर्व नेम. अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.
मार्गदर्शक:-*
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 93719 57391
2) मा.श्री.माधव रेड्डी सो. अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) श्री.नरेंद्र पवार सो. वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, जयचंद नगर, नंदुरबार दुरध्वनी क्रं. ०२५६४-२३०००९
टोल फ्रि क्रं. 1064
nandurbar acb raid bribe corruption crime panchayat samiti