नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील आनंदवाडी येथे मेहुण्यानेच शालकाला लोखंडी हातोडीने वार करुन जिवे ठार मारल्याची घटना घडली आहे. वाल्मीक साहेबराव ठाकुर (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आई बापाला दारु पिऊन त्रास देतो म्हणून शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत मेहूण्याने हा खून केल्याचे समोर आले आहे.
या घटनेबाबत प्रदीप निवृत्ती ठाकुर यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी ईश्वर देवराम ठाकुर.(शिक्षक) वय ४६ रा.कैलास नगर नांदगांव याने मंगळवारी मयत वाल्मीक ठाकुर हा आई वडिलांना म्हणजे संशयीत आरोपीच्या सासु सास-यांना दारु पिऊन नेहमी मारहाण करीत असे या कारणास्तव शालकास हातोडीने पायावर व डोक्यावर गंभीर वार केल्याने तो मयत झाला आहे.
या घटनेनंतर अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, डीवायएसपी समिरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला. सुरूवातीला संशयीत आरोपी हा खुनाची कबुली दिली नाही. पण, पोलिसांनी डॅाग पाचारण केल्या नंतर संशयीत आरोपीने कबूली दिली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
Nandgaon Crime Murder Police Investigation