अजय सोनवणे
नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयाटो कंपनीची कार यांच्यात अपघात होवून एक जणाचे दवाखान्यात नेत असताना निधन झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. नांदगावशहरा जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयाटो कंपनीची कार एम. एच. १५ डी एस ९३९० यांच्यात समोरा समोर अपघात होवून मोटार सायकल चालक समाधान जगंलू गायकवाड ( रा. इंदीरानगर कळमधरी) यांचे मालेगाव येथे दवाखान्यात नेत असतानां निधन झाले. तर मागे बसलेला विलास शंकर धोत्रे हा गंभीर जखमी झाला असून त्यास मालेगाव येथे दवाखान्यात हलविण्यात आले आहे. अपघात होताच मोटारसायकल हवेत उंच उडाली व तिने पेट घेतला यामध्ये मोटारसायकल जळून पुर्ण खाक झाली. कारचालक घनश्याम हनुमंत निकम रा पंचवटी नाशिक हे जखमी झाले असून त्यांच्यांवर नांदगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू आहे. नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील पो. नि. रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पो. ह. राजू मोरे हे करीत आहे.