अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला रस्त्यावरील तांदुळवाडी शिवारात दिलीप पारख यांच्या शेतात मका पिकामध्ये ३० वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना समोर आली आहे. या युवकाचा खून करुन त्याला अर्धवट जाळून टाकल्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पारख यांची शेती कसणारे सालदार प्रकाश घुले हे सकाळी शेतात गेले असता त्यांना सदर मृतदेह दिसून आला . त्यांनी त्वरीत नांदगाव पोलिसांना सदर खबर दिली. सदर युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. घटना स्थळावर डीवायएसपी समीरसिंग साळवे, पोलिस निरीक्षक रामेश्र्वर गाढे हे दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.