नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अर्जुन बंडू पाटील तसेच उपसभापतीपदी पोपट सानप यांची निवड आज निवड झाली. सभापती अर्जुन बंडू पाटील हे जातेगावचे तर उपसभापती पोपट सानप हे वेहेळगावचे आहे.
आमदार सुहास अण्णा कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे हार पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी बोलताना बापूसाहेब कवडे व आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना नेते पदाधिकारी तसेच सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यात मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने बहुमत मिळवले तर नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ.सुहास कांदे यांच्या पॅनलचे संचालक निवडून आले.