नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी झाले आहेत. त्यांनी पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण केला होता. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. याद्वारे महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. नागपूर हा भाजप नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानला जातो. आणि तेथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. आडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळविला आहे. आता नागपुरात महाविकास आघाडीने खाते उघडले आहे. आडबाले हे वाशिमचे आहेत. राज्यात विधान परिषदेच्या एकूण ५ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात एक जागा भाजपला आणि एक जागा काँग्रेसला मिळाली आहे. उर्वरीत नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या तीन ठिकाणची मतमोजणी सुरू आहे. अद्याप तेथील कल स्पष्ट झालेला नाही.
https://twitter.com/BodkheShilpa/status/1621089895640109056?s=20&t=AJ5uoH2Ysaz60v5O224h5Q
Nagpur Teachers Constituency Election Counting