गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आली लहर, केला कहर… न्यायमूर्तींच्या कारमधून थेट फेरफटका मारला… असे फुटले बिंग… अखेर पोलिसावर झाली ही कारवाई…

by India Darpan
मे 25, 2023 | 5:28 am
in राज्य
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे कार्यरत असलेले कर्मचारी असो की, पोलीस शिपाई वरिष्ठांच्या वाहनांचा उपयोग करतात, परंतु असे करताना काही वेळा त्याचा वापर खासगी कामासाठी केला, तर ही बाब अंगलट येऊ शकते, नागपूर शहरात देखील असाच एक प्रकार घडला, त्यामुळे एका पोलीस शिपायाला चक्क आपली नोकरी गमवावी लागली.

निवासाची सुरक्षा वाऱ्यावर
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बंगल्यातून न्यायाधीशाची कार काढून शहरात फेरफटका मारणे एका पोलीस शिपायाला चांगलेच महागात पडले आहे. पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबितच केले नाही तर त्याची पोलीस दलातून थेट हकालपट्टी केली आहे. नागपूर पोलिसांचा अमित झिल्पे हा पोलीस कर्मचारी नागपूर उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून सेवेत कर्यरत होता. मध्यरात्रीनंतर सर्वत्र सामसूम झाल्यावर न्यायाधीशांना काहीही माहित होणार नाही, असा विचार करून अमित झिल्पे याने गुपचूपपणे न्यायाधीशांची खासगी कार बंगल्याबाहेर काढली आणि न्यायाधीशांच्या निवासाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून तो नागपूर शहरात आलिशान कारमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला.

येथे झाली गडबड
हा पोलीस शिपाई कारमधून मोठ्या ऐटीत फिरत असताना एका विजेच्या खांबावर ती आलिशान कार धडकली. त्यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. घाबरलेल्या अमित झिल्पेने रात्रीच्या अंधारातच ती कार पुन्हा न्यायाधीशांच्या बंगल्यावर आणली आणि होती त्या ठिकाणीच उभी केली. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायाधीश जागे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कारची दुर्दशा पाहिली. रात्री बंगल्याच्या पोर्चमध्ये सुरक्षितरीत्या उभी केलेली कार सकाळी अशी अपघातग्रस्त कशी काय झाली ? असा प्रश्न त्यांना पडला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेज
पोलिसांनी चौकशी सुरू केली. न्यायाधीशाच्या बंगल्याच्या बाहेरील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा त्यामध्ये न्यायाधीशांची कार मध्यरात्री रस्त्यांवर धावताना दिसली. बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी झिल्पे याला विचारणा करण्यात आली आणि त्याने आपणच फेरफटका मारण्यासाठी कार बंगल्याबाहेर नेल्याची कबुली दिली. आधी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमित झिल्पेला निलंबित केले होते. मात्र, त्याची ही गोष्ट गंभीर असल्याने असल्याने त्याला पोलीस दलातून कायमचा बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

Nagpur High court Judge Car Police Action

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समृद्धी महामार्गाचा नागपूर-नाशिक टप्पा सुरू झाल्याने होणार एवढे सारे फायदे

Next Post

इयत्ता बारावीचा निकाल थोड्याच वेळात…. पाहण्यासाठी येथे क्लिक करा

India Darpan

Next Post
SSC HSC EXAm e1678445808209

इयत्ता बारावीचा निकाल थोड्याच वेळात.... पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011