शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाफेडने कांदा खरेदी थांबवली… शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण…. बाजारभाव कोसळले

by India Darpan
मार्च 29, 2023 | 6:17 pm
in संमिश्र वार्ता
0
kanda 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याला भाव मिळत नसल्याने नाफेडद्वारे खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता नाफेडनेही खरेदी थांबविल्याने बळीराजा हवालदिला झाला आहे. कांद्याने केलेल्या वांद्यामुळे मोठ्या आर्थिक संकटातून शेतकरी जात आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांदा खरेदी सुरु होती. ती अचानक बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी जास्तीजास्त ११४१ रुपयांवर असलेले दर आज ८५१ रुपयांपर्यंत दर घसरले आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवार च्या तुलनेत आज जास्तीत जास्त दरात ३०० रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

साधारणपणे कांद्याचे दर हे दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेड मार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू झाली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यातील शुक्रवार पर्यंत बारा हजार मॅट्रिक टन कांद्याची खरेदी साडेतीन हजार शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदी ही बंद करण्यात आली आहे.

कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. त्यात मागील काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी परवड निर्माण झाली आहे. त्यात आता पुन्हा नाफेडपासून सुरू केलेली कांद्याची खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे.

Nafed Onion Purchasing Farmers Rates APMC Market

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजाराम साखर कारखाना निवडणुकीत नवा ट्विस्ट; माजी मंत्री सतेज पाटील गटाचे तब्बल २९ उमेदवार अपात्र

Next Post

मोहम्मद फैजल यांची खासदारकी परत… राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा… राहुल गांधींनाही खासदारकी मिळणार?

Next Post
FsXrXUZWIAMmS0r

मोहम्मद फैजल यांची खासदारकी परत... राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा... राहुल गांधींनाही खासदारकी मिळणार?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011