नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – २८ ऑगस्टला मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत मतदारांना मतदानाच्या वेळी मोबाईल वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे तारहणविरहीत दूरध्वनी, आणि बिनतारी संदेश, छुपे कॅमेरे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण, निरीक्षक, सुक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्राध्यक्ष व सुरक्षा कर्मचा-यांना परवाणगी दिलेली आहे. या महत्त्वाच्या सुचना नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिल्या आहे.
या सुचनांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या सिल करतेवेळेस तसेच मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये पोहचेपर्यंत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव ग्रामीण यांना सटाणा पोलिस ठाणे हद्दीतील मराठा विद्या प्रसारक समाज पंचवार्षिक निवडणूक करिता आपले विभागातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा, उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड विभाग यांनी निफाड पोलिस ठाणे हद्दीतील मराठा विद्या प्रसारक समाज पंचवार्षिक निवडणूक करिता आपले विभागातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा. यासारख्या सुचना करण्यात आल्या आहे. त्या खालील प्रमाणे आहे.