मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘केरळ स्टोरी’ या चित्रपटानंतर मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलगी यांच्यातील लग्नाच्या प्रकरणांवर सोशल मिडियावर विशेष चर्चा होऊ लागली आहे. कारण ‘लव्ह जिहाद’ हा विषय तसाही ज्वलंत होता. मुंबईतही अशीच एक भयंकर घटना घडल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबईतील भांडूप परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मुस्लीम तरुणाने बाहेरच्या राज्यात पळवून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भांडुप येथे राहणारी ही मुलगी फक्त १३ वर्षांची आहे. तिच्या घराजवळ एका सलूनमध्ये सैफ खान नावाचा १९ वर्षांचा तरुण काम करतो. ८ मेच्या रात्री मुलगी घरात नाही म्हणून तिच्या आजीने बाबांना कळवले. बाबांनी अख्खे भांडूप शोधले, पण मुलगी सापडली नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.
९ मे रोजी सकाळी सैफ आणि काही लोकांसोबत ही मुलगी कुर्ल्यावरून आझमगडला रवाना झाली. पण या सर्व गोष्टींचा खुलासा मुलीच्या फोनमुळे झाला. दोन दिवसांनी एका नंबरवरून मुलीने बाबांना फोन केला आणि पोलिसांत केलेली तक्रार रद्द करा आता माझं लग्न झालं आहे, असे सांगितले. मी कुठे आहे मला माहिती नाही, पण तुम्ही आता मला विसरून जा, असे मुलीने बाबांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तो नंबर ट्रॅक केला तर उत्तर प्रदेश येथील आझमगडमध्ये सापडला.
मुलीच्या बाबांना घेऊन भांडुप पोलीस उत्तर प्रदेशात गेले. तिथे आझमगड पोलिसांच्या मदतीने मुलीला सोडवले आणि ताब्यात घेतले. मुलीला पाच दिवस कोंडून ठेवण्यात आले होते. तिच्याकडून मोबाईल फोन काढून घेत मुलाचे वडील, भाऊ व नातेवाईकांनी वडिलांना फोन करायला सांगितले. पोलीस तक्रार मागे घ्या, आता माझे लग्न झाले आहे, हे सांगायला लावले.
सैफ खान एकटा नाही
किरीट सोमय्या यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. एकटा १९ वर्षांचा सैफ खान हे करू शकत नाही. त्याच्या सोबत अनके लोक आहेत. त्यामुळेच एवढी हिंमत तो करू शकला. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1661395473801019393?s=20
Mumbai Love Jihad Girl Father Tell Story