मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला आयपीएलचा पहिला हंगाम लवकरच सुरू होणार आहे. अवघ्या देशभरातील क्रीडाप्रेमींमध्ये त्याबाबत उत्सूकता दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचाइजीने तयारी सुरू केली आहे. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेसाठी नुकतिच प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. यात इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सकडे मुख्य प्रशिक्षकपद, झुलन गोस्वामीकडे गोलंदाजी प्रशिक्षकपद तर मराठमोळी देविका पळशीकरकडे फलंदाजी प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. तिच महिला क्रिकेटपटूनमा बँटिंगचे धडे देऊन विजयासाठी सज्ज करणार आहे.
जाणून घ्या देविकाबद्दल…
देविका पळशीकर ही भारताची माजी क्रिकेटपटू आहे. ती मूळची मालवणची असून, तिचा जन्म २० जून १९७९ ला मराठी कुटुंबात झाला. देविकाने आपल्या कारकिर्दीत उत्तम फलंदाजी केली. गोलंदाज म्हणूनही तिची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. उत्तम लेग ब्रेक फिरकी गोलंदाज म्हणून तिने ओळख निर्माण केली आहे. देविकाच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर तिला भारतासाठी खेळायची संधी मिळाली. पण, तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर २००६ ते २००८ या कालावधीत केवळ एक कसोटी आणि १५ वन डे सामने खेळता आले. देशांतर्गत क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास, तिने एअर इंडिया आणि महाराष्ट्र या दोन संघांकडून क्रिकेट खेळले. पण, तिला फारशी चमक दाखवता आली नाही.
प्रशिक्षक म्हणून ठरली उजवी
२०१४ आणि २०१६ साली देविका भारताच्या महिला संघाची सहाय्यक प्रशिक्षक होती. २०१८ साली तिने बांगलादेश संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाची भूमिकाही सार्थ पार पाडली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने विविध संघांना प्रशिक्षण दिले. तसेच, विमेन्स टी२० चॅलेंज स्पर्धेत ती व्हेलॉसिटी संघाचीही प्रशिक्षक होती.
Mumbai Indians IPL Team Batting Coach Marathi Lady
Devieka Palshikar