मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील ऐतिहासिक अशा बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला तडे गेले आहेत. त्यानुसार शिवलिंगाला तडे गेले असून येथे पूजा, अभिषेक करण्यास भाविकांना मज्जाव करण्यात आला आहे. आयआयटी पवईच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. राजा भीमदेव यांनी हे मंदिर बाराव्या शतकात बांधले होते. हे मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले होते. मात्र, १७८० मध्ये मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराच्या दर्शनासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून भाविकांनी बाबुलनाथ मंदिरात दर्शन करण्यासाठी येतात. शिवलिंगावर अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये दूध, पाणी, मध, दही, कुंकू, अबीर, भस्म, गुलाल, चंदन, बेलपत्र आणि इतर अनेक पदार्थ वाहण्यात येतात. बाजारात मिळणारे बरेचसे पदार्थ हे भेसळयुक्त असतात. त्यामुळे ही भेग पडलेली असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता पाण्याव्यतिरिक्त अन्य सर्व पदार्थांच्या अभिषेकाला मनाई करण्यात आली आहे.
आयआयटी पवई करतेय अभ्यास
बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला गेलेल्या तड्यांबाबत आययआयटी पवई अभ्यास करत आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत यासंदर्भातील सविस्तर अहवाल प्राप्त होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात श्री बाबुलनाथ मंदिर धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष नितीन ठक्कर म्हणाले,‘कोरोनाकाळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत असल्याचे मंदिराच्या पुजाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यानंतर मंदिर ट्रस्टने आयआयटी बॉम्बेकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.”
केवळ पाण्याचा प्रयोग
शिवलिंगावर अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये दूध, पाणी, मध, दही, कुंकू, अबीर, भस्म, गुलाल, चंदन, बेलपत्र आणि इतर अनेक पदार्थ वाहण्यात येतात. बाजारात मिळणारे बरेचसे पदार्थ हे भेसळयुक्त असतात. त्यामुळे ही भेग पडलेली असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता पाण्याव्यतिरिक्त अन्य सर्व पदार्थांच्या अभिषेकाला मनाई करण्यात आली आहे.
https://twitter.com/atuljmd123/status/1631176837245321216?s=20
Mumbai IIT Report on Mumbai Babulnath Temple Shivling