India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नंदुरबारमध्ये मोठा मासा गळाला! तब्बल ४३ लाख लाचेची मागणी… साडेतीन लाखांची लाच घेताना क्लास वन अधिकारी जाळ्यात

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गळाला लागला आहे. तब्बल साडेतीन लाखाची लाच घेताना कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यानिमित्ताने बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली असून टक्केवारीही चर्चेत आली आहे.

याप्रकरणी एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर महेश पाटील हा नंदुरबारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. ५१ वर्षे वय असलेल्या पाटील हा रा. फ्लॅट २०३, अष्टविनायक टाॅवर, थत्ते नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे राहतो. नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची व डागडुगीची कामे एका शासकीय ठेकेदाराने पूर्ण केली आहेत. तसेच सध्याच्या कालावधीत या ठेकेदाराच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे या कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा या कार्यालयात आले आहेत. परंतु नमूद तिन्ही कामांचे कार्यारंभ आदेश ठेकेदाराला मिळाले नाहीत.

ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामांबाबतची ३ कोटी ९२ लाख ७९ हजार २८५ रुपये एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व याव्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे ५ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या रकमेचे कार्यारंभ आदेश मिळणे आवश्यक होते. हे आदेश लाचखोर महेश पाटील कडून दिले जाणार होते. त्यामुळे ठेकेदाराने त्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. अनेक वेळा विनंती केली. परंतु लाचखोर पाटीलने बिलाची रक्कम मंजूर केली नाही. तसेच कार्यारंभ आदेश सुद्धा दिले नाहीत. पूर्ण केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी वेळोवेळी १०% व तिन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी ०.७५ ते १ टक्के अशा टक्केवारीच्या स्वरूपात एकत्रित ४३ लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी केली.

अखेर याप्रकरणी संबंधित ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार, मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी ३ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम लाचखोर महेश पाटील याने त्याच्या शहादा येथील शासकीय निवासस्थानी स्वीकारली. त्याचवेळी त्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

एसीबीच्या पथकामध्ये राकेश आ. चौधरी, पोलिस उप अधीक्षक, पो.नि. समाधान एम. वाघ, पो.नि. माधवी एस. वाघ, पोहवा/विलास पाटील, पोहवा/विजय ठाकरे, पोना/देवराम गावित, पोना/अमोल मराठे, पोना/ज्योती पाटील, पोना/मनोज अहिरे, पोना/संदीप नावाडेकर व चापोना/जितेंद्र महाले यंचा समावेश होता.

हा मोठी कारवाई शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहाळदे, अपर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार,  पोलीस उप अधीक्षक  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान एसीबीने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, जयचंद नगर, नंदुरबार.
दुरध्वनी क्रं. ०२५६४-२३०००९
टोल फ्रि क्रं. 1064

Nandurbar ACB Raid Bribe Corruption Trap


Previous Post

बाबुलनाथ मंदिराच्या शिवलिंगाबाबत मुंबई आयआयटीने दिला हा अहवाल; यावर आता निर्बंध

Next Post

पोलीसाला मारहाण करताना चारदा विचार करा! निफाड न्यायालयाने दोषीला ठोठावली ही शिक्षा

Next Post

पोलीसाला मारहाण करताना चारदा विचार करा! निफाड न्यायालयाने दोषीला ठोठावली ही शिक्षा

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group