शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सीबीआय आणि ईडीला उच्च न्यायालयाने जोरदार फटकारले

by India Darpan
सप्टेंबर 16, 2022 | 5:34 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
mumbai high court

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरोपीला अटक केल्यानंतर विविध न्यायालयांनी जामीन मंजूर केल्यानंतरही त्याविरुद्ध दिसताक्षणीच ताब्यात (लुक आऊट नोटीस) घेण्याचा आदेश काढणाऱ्या सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यपद्धतीवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा स्वत:ला संसदेपेक्षा श्रेष्ठ समजते का, असे खडेबोलही उच्च न्यायालयाने सुनावले आहेत.

सीबीआयच्या सांगण्यावरून गृहमंत्रालयाने दिसताक्षणीच ताब्यात घेण्याचे आदेश काढल्याविरोधात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची कन्या रोशनी कपूर हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिच्या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी सीबीआय आणि ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने याविषयी सीबीआय आणि ईडीला प्रश्न विचारला आहे. आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सोडले असताना कोणत्या कायद्यानुसार त्याच्याविरोधात दिसताक्षणी ताब्यात घेण्याचा आदेश काढला, एकदा जामीन मंजूर झाल्यावर आरोपी जामीन मंजूर करणाऱ्या न्यायालयाच्या ताब्यात असतो, असे असताना तपास यंत्रणा अशा न्यायिक आदेशांचे उल्लंघन कसे करू शकतात, तपास यंत्रणा स्वत:ला संसदेपेक्षा श्रेष्ठ समजतात का, असा संतप्त प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

दिवाण हाऊसिंग फायनान्शिअल लिमिटेडला आर्थिक मदत देण्याच्या बदल्यात कथितपणे लाभ मिळवण्याच्या गुन्हेगारी कटाचा भाग असल्याबद्दल सीबीआय आणि ईडीने कपूर हिची चौकशी केली होती. याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी अटक केलेल्या आरोपीविरुद्ध दिसताक्षणी ताब्यात घेण्याचे आदेश देणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचा दावा कपूर यांच्यातर्फे करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन अटक करण्यात आलेल्या व्यक्तीविरुद्ध असा आदेश कसा काढला जाऊ शकतो, अशी न्यायालयाने विचारणा केली. हा आदेश केवळ फरारी आरोपींबाबत काढला जात असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

याबाबत आरोपीला अटक केल्यानंतर दिसताक्षणी ताब्यात घेण्याची नोटीस रद्द न करता ती केवळ स्थगित करण्यात येते असा दावा दोन्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या वतीने अधिवक्ता हितेन वेणेगावकर यांनी केला. जामिनावर सुटलेला आरोपीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन करून पलायन करत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे ताब्यात घेण्याची नोटीस रद्द न करताना निलंबित ठेवणे गरजेचे असल्याचेही वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने मात्र या युक्तिवादाशी असहमती दर्शवली आहे. कायदेशीर प्रक्रिया न पाळता पळून जाणाऱ्या आरोपीला रोखणे हा यामागचा उद्देश असला तरी आरोपींना जामिनाच्या अटी घालण्यात आलेल्या असतात. त्यामुळे तपास यंत्रणांनी कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजू नये, अशी कानटोचणी या यंत्रणांची केली आहे.

Mumbai High Court on CBI ED Work Case Hearing
Legal Investigation Agencies

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शैक्षणिक प्रवेशासाठी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

Next Post

१६ सप्टेंबर, ओझोन दिन विशेष: ओझोन रक्षणार्थ प्रबोधन जागृतीचे १७ वे वर्ष; विजय गोळेसर यांचा उपक्रम

Next Post
IMG 20220914 WA0010 e1663245143514

१६ सप्टेंबर, ओझोन दिन विशेष: ओझोन रक्षणार्थ प्रबोधन जागृतीचे १७ वे वर्ष; विजय गोळेसर यांचा उपक्रम

ताज्या बातम्या

IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011