गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विमान प्रवाशांनी शरीरात याठिकाणी लपवले कोकेन; तब्बल २९ कोटींचा साठा जप्त

by India Darpan
मार्च 8, 2023 | 11:01 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsAppImage2023 03 07at8.30.10PMIEY3 e1678253177663

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल २९.७ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तस्करी केलेले कोकेन मुंबईच्या सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे. अदिस अबाबा मार्गे लागोसहून मुंबईला प्रवास करणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांकडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी होऊ शकते अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. या खबरीच्या आधारे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवून ही कारवाई केली.

३ मार्च २०२३ रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय अधिकाऱ्यांच्या) पथकाने संशयित प्रवाशांना अडवले. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) पदार्थ त्यांनी गिळल्याचा तसेच तो अमली पदार्थ शरीरात लपवल्याचा त्यांच्यावर संशय होता. त्यामुळे त्यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांनी या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

दोन प्रवाशांनी ३ दिवसांच्या कालावधीत काही विशिष्ट अंमली पदार्थ असलेल्या १६७ कॅप्सूलचे सेवन केल्याची पुष्टी वैद्यकीय तपासणी अहवालातून मिळाली. या प्रवाशांकडे सापडलेल्या पदार्थाची चाचणी घेतल्यानंतर त्यात कोकेन असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे सापडलेल्या कॅप्सूलमधून एकूण २.९७६ किलो कोकेन एनडीपीएस कायदा, १९८५ नुसार जप्त करण्यात आले आहे. अवैध आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनचे मूल्य सुमारे रु. २९.७६ कोटी रूपये आहे. दोन्ही प्रवाशांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांद्यासाठी मोदी सरकारचा सर्जिकल स्ट्राईक? नाफेडच्या खरेदीनंतर आता उचलले हे पाऊल

Next Post

फलक रेखाटनातून कलाशिक्षकाने दिल्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

India Darpan

Next Post
IMG 20230308 WA0182 1 e1678254653929

फलक रेखाटनातून कलाशिक्षकाने दिल्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011