ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – 32 वर्षीय महिलेने 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी पोलिसांना तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, आरोपी महिलेला तीन मुले आहेत आणि ती त्यांच्या नातेवाईकांची शेजारी आहे. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच तिला अटक करण्यात येईल.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला वारंवार मुंबईत येऊ लागली होती आणि हळूहळू अल्पवयीन मुलाशी मैत्री करत होती. तक्रारीचा हवाला देत ठाण्यातील कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी महिलेने अल्पवयीन मुलाला दारू पिण्यास भाग पाडले आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीनुसार, मुलगा शाळा सोडून नाशिकमध्ये महिलेला भेटायला जात असे. एवढेच नाही तर आरोपी महिलेने अल्पवयीन मुलाला अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही दाखवले होते.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे सर्व 2019 ते डिसेंबर 2022 पर्यंत चालले. यानंतर अल्पवयीन मुलाच्या आईला हा प्रकार कळला. आता पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीच्या आधारे, आरोपी महिलेविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आलेली नाही.
Mumbai Crime Shocking Women Sexual Molested Minor Boy