मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शुद्धीकरणाच्या बहाण्याने मांत्रिकाने डाव साधत एका महिलेवर तिच्या पतीसमक्ष बलात्कार केला. बोरिवली येथे हा अतिशय संतापजनक प्रकार उघडकीस आला असून यावर संतप्त प्रतिक्रिया समाजातून येताहेत.
पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, त्या पालघर येथे राहतात. २००१ ते मे २०२२ दरम्यान तिचा पती वारंवार मारहाण करायचा. दरम्यान, एकदा २१ वर्षीय मुलीचे भूत मागे लागल्याचे सांगत शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली तिला पतीने तांत्रिक बाबा संदीप जोशीकडे नेले. त्याने त्याच्या बोरिवलीतील भूषण प्लाझामधील फ्लॅटमध्ये नेले.
तेथे सुरुवातीला बाबाने जातिवाचक अपमानास्पद वक्तव्य केले. प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून पतीसमोर बलात्कार केला. तसेच बाबाच्या सांगण्यावरून चांदीच्या वाटीत मासिक पाळीचे रक्त तांत्रिक पूजेसाठी वापरले. पुढे त्रासातून कायमची सुटका करण्यासाठी ४९ हजार रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर मृत्यू होईल, अशी भीती घालून ४९ हजार रुपये उकळलेत. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार सहबलात्कार व खंडणी, जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
Mumbai Crime Advocate Women Rape Ahead of Husband