मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक छोटे-मोठे व्यवसाय व्यवसायिक आणि ग्राहक दाम दुप्पट रक्कम मिळेल या आशेने बँकेत पैसे ठेवण्याऐवजी पतपेढीमध्ये पैसे गुंतवतात. मात्र अनेक वेळा त्यांची फसवणूक होत असल्याचे कालांतराने उघड होते. तरीही अशा पतसंस्था व पतपेढ्या सुरूच असतात, असे दिसून येते. मुंबईतही असाच एक फसवणुकीचा प्रकार घडला. बोगस सहकारी पतपेढी काढून छोटे छोटे व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना गुंतवणुकीतून ६ वर्षात दाम दुप्पट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बोगस पतपेढी संस्था चालकास अटक करण्यात आली आहे. साधारणपणे चार हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
रामसिंग चौधरी (३९ ) असे अटक करण्यात आलेल्या पतसंस्था संचालकाचे नाव नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साईलीला या मोर्चा पतसंस्थेचे शिक्के व लेटरहेड वापरून आरोपी रामसिंग चौधरी यांनी ‘प्रतिज्ञा’ या नावाचीही बोगस पतसंस्था तयार केली होती. ही पतसंस्था रस्त्यावरील फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांना गुंतवणूक करून सहा वर्षात दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे आश्वासन देत असे. त्याशिवाय ‘लाडली योजना’ आणि इतर योजनांच्या माध्यमातूनही मुलींच्या वडिलांना अडीचपट लाभ व प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मात्र, मुदत संपून गेल्यानंतरही रामसिंग चौधरी यांनी गुंतवणूकदारांना आपले पैसे परत दिले नाहीत.
मालाड पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांनी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. तपास केला असता आरोपी रामसिंग चौधरी याने लॉकडाऊनच्या काळात गरीब जनतेने जमा केलेली रक्कम बँकेत जमा केल्याचे उघड झाले. त्याचा कर्ज म्हणून वापर करून तो अधिक नफा आणि व्याज कमवत होता, परंतु मुदत पूर्ण होऊनही ज्यांचे पैसे क्रेडिट सोसायटीमध्ये जमा होते त्यांना तो पैसे परत करत नव्हता. एवढेच नव्हे तर आपल्या तारणाचे नुकसान केल्याने सहकारी पतसंस्था बंद झाल्याचे आरोपीने अनेकांना सांगितले.
संशयित आरोपी रामसिंग हा एवढा रस थांबला नाही तर त्याची मजल आणखी त्याच्या पुढे गेली. त्याने गोरेगाव येथेच ‘साबेरा’ ही दुसरी पतसंस्था उघडून फसवणुकीचा धंदा चालवत होता. मालाड पोलिसांनी तपास करत आरोपीपर्यंत पोहोचून त्याला अटक केली. तपासात आरोपी रामसिंग आणि त्याच्या अन्य आठ साथीदारांनी मिळून अशा बोगस पतसंस्था तयार करून नागरिकांच्या रोजच्या बचतीतून लाखोंची रक्कम गोळा केली व तेच पैशातून अधिक नफा कमावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मालाड पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र आपली गेलेली रक्कम परत मिळेल की नाही याची व्यवसायिकांनी चिंता लागली आहे.
Mumbai Bogus Credit Bank Fraud Crore Rupees