India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

काठमांडू येथे नेपाळ -भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न

India Darpan by India Darpan
February 28, 2023
in साहित्य व संस्कृती
0

 

काठमांडू (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित नेपाळ – भारत बहुभाषिक कवि संमेलनाचे सहअध्यक्ष म्हणून नांदेडच्या साहित्यिक डॉ.ज्योती कदम या आमंत्रित होत्या. बहुभाषिय संमेलनामुळे नेपाळ- भारत मैत्रीचे धागे अधिक घट्ट होतील असा विश्वास डॉ.ज्योती कदम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. डॉ.ज्योती कदम यांच्या “आदिम जाणीव” या कवितेने उपस्थित रसिक – श्रोते यांना मंत्रमुग्ध करीत रसिकांची दाद मिळवली. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ-भारत बहुभाषिक साहित्य संमेलन संपन्न झाले.

भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा जि . सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ -भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली, अवधी, संस्कृत, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी व इंग्रजी अशा १२ भाषेतील तीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे संमेलन काठमांडू येथे संपन्न झाले .
भारतीय दूतावासातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ .आसावरी बापट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री . भूपाल राई,कुलपती नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान,श्री बिमल कृष्ण श्रेष्ठ, उप कुलपती नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान व डॅा. गंगाप्रसाद अकेला, ज्येष्ठ साहित्यिक हे लाभले होते.अध्यक्षस्थान त्रिभुवन विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख डाॅ .संजीता वर्मा यांनी भूषविले. नेपाळचे राजदूत श्रीवास्तव सर या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते . यावेळी श्री . काशिनाथ न्यौपाने हिंदी विभाग त्रिभुवन विश्वविद्यालय,गिरीश चंद्र लाल नेपाळ उच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश,प्रोफेसर माधव प्रसाद पोखरेल नेपाळ प्रतिष्ठित भाषातज्ञ उपस्थित होते . सह अध्यक्षा म्हणून २४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ .ज्योती कदम , नांदेड या उपस्थित होत्या .

रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ .स्मीता पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉ .उर्मिला चाकूरकर, डॉ .स्वाती शिंदे -पवार श्री . अनिल पवार, प्रा . डॉ . प्रीती शिंदे – पाटील , आशा डांगे, डॉ .शुभा लोंढे यांनी केले .विशेष अतिथी म्हणून मनोज पाठक, प्रा.डॉ . विलास पाटील, श्री. दिनकर जोशी , श्री . चंद्रशेखर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ .ज्ञानेश्वर मुळे यांनी पाठवलेला शुभसंदेश सर्व रसिकांना चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला.भाषेचे राष्ट्राच्या प्रगतीत खूप मोठे योगदान असते.भारत व नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक गहिरे करण्यासाठी सर्व साहित्यिक प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या डाॅ . स्वाती शिंदे पवार,श्री . अनिल पवार , प्रा . डॉ .प्रीती शिंदे -पाटील यांनी अक्षरयात्री प्रतिष्ठानचे हे रौप्य महोत्सवी संमेलन काठमांडू येथे साजरे करून एक नवे पाऊल टाकले आहे.

या संमेलनासाठी महाराष्ट्रातून दहा कवी व कवयित्री यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक भाषेतील कवी कवयित्रींनी आपल्या दर्जेदार कविता यावेळी सादर केल्या . वेगवेगळ्या बारा भाषेतील साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग नोंदविल्याने इतर भाषेतील विचारांची आधार प्रदान यावेळी चांगल्या प्रकारे झाली .

जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनाप्रमाणे मराठी भाषेचे साहित्यिक कार्यक्रम जगभर करण्याची भूमिका यावेळी डॉ .स्वाती शिंदे – पवार यांनी बोलून दाखविली. त्रिभुवन विद्यापीठ व संस्कृत विद्यापीठातील कुलपतींनी यावेळी मराठी साहित्यिकांना विद्यापीठांमध्ये येण्याचे आमंत्रण दिले . भारतीय भाषेतील कवितांचा अनुवाद इतर भाषेमध्ये करणारी मंडळी या संमेलनातून पुढे आली . मराठी भाषेतील उत्कृष्ट कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली . नेपाळचे माजी राजदूत श्री . ठाकूर सर यांनी भारतीय साहित्यिकांना चहापानासाठी निमंत्रित केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राजदूतावास नेपाळ आणि अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी डॉ . ज्ञानेश्वर मुळे माजी राजदूत व डॉ .आसावरी बापट यांनी खूप परिश्रम घेतले .

या एक दिवसीय साहित्य संमेलनानंतर भारतीय साहित्यिकांसाठी अक्षर यात्री प्रतिष्ठान व स्वराज हॉलिडेज विटाच्या संचालिका अमृता जाधव व रवी जाधव यांनी पर्यटन व्यवस्था अत्यंत उत्तम केली . साहित्यिकांच्या सत्कारांचे नियोजन अनुजा पाटील व संध्या धाट यांनी केले. या संमेलनामुळे भारत नेपाळ मैत्रीचा पूल बांधण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास दोन्ही देशातील साहित्यिकांनी व्यक्त केला . यावेळी प्रा .डॉ . विलास पाटील परभणी यांनी बहिणबाई, डॉ .उर्मिला चाकूरकर पैठण यांनी विठोबा, डॉ . ज्योती कदम नांदेड यांनी आदिम जाणीव,श्री . मनोज पाठक बुलढाणा यांनी ए और वो ही हिंदी कविता सादर केली .,प्रा प्रीती शिंदे -पाटील वारणा
नगर यांनी माय मराठी ही कविता म्हणून रसिकांची चांगलीच पसंती मिळवली .

श्री .दिनकर जोशी बीड यांनी सोन्याचा पिंपळ, डॉ .स्मिता पाटील मोहोळ यांनी तिचा ठाव, डॉ . शुभा लोंढे पुणे यांनी लगते है ही हिंदी ऊर्दू बहारदार गझल सादर करून भलतीच वाहवा मिळविली . आशा डांगे औरंगाबाद यांनी जत्रा, डॉ .स्वाती शिंदे -पवार यांनी साहित्यिक आहे मी एल्गार आहे ही कविता सादर केली. या संमेलनातील सर्वच कवी हे प्रतिथयश मान्यवर कवी असल्याने हे साहित्य संमेलन अधिक समृद्ध झाले .यावेळी अक्षरयात्री प्रतिष्ठानने विश्व संमेलनाच्या उचललेल्या पावलाचे मनापासून स्वागत व कौतुक करण्यात आले .


Previous Post

कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक

Next Post

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group