मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागरकोईल तामिळनाडू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ, ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या मुकुंद संतोष आहेर याने ऐतिहासिक कामगीरी करीत राष्ट्रीय सिनियर व ज्युनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनियर मध्ये तीन व सिनिअर मध्ये मध्ये एक असे एकूण चार नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत तीन सुवर्णपदके पटकवीत ऐतिहासिक कामगिरी केली असून चार राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर करणारा मुकुंद महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे
55 किलो वजनी गटात सहभागी होत मुकुंदने मध्ये स्नॅच मध्ये 114 किलो वजन उचलून ज्युनिअर व सिनियर या दोन्हीही वयोगटात दोन नवीन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केले स्नॅच मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रमी कामगिरी करताना ज्युनियर मध्ये 108 किलो चा व सिनियर मध्ये 113 किलो चा विक्रम 114 किलो वजन उचलून मोडीत काढत चुरशीच्या स्पर्धेत विक्रमी कामगिरी बजावली क्लिन जर्क मध्ये सुद्धा ज्युनिअर चा 139 किलो चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढीत 140 किलो वजन उचलून ज्युनिअर मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला 244 किलोचा एकूण वजन उचलण्याचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत 254 किलो वजन उचलत ज्युनिअर गटामध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला चार नवीन राष्ट्रीय विक्रमांसह ज्युनिअर सिनियर व आंतरराज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावली
40 किलो मुलींच्या युथ वजनी गटात मुकुंद ची लहान बहीण वीणाताई संतोष आहेर हिने चुरशीच्या लढतीत आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत स्नॅच मध्ये 57 किलो व क्लिन जर्क मध्ये 66 किलो असे एकूण 123 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आंतरराष्ट्रीय खेळाडू व 40 किलो युथ वजनी गटातील राष्ट्रीय विक्रम नावावर असणारी आकांक्षा किशोर व्यवहारे हिने राष्ट्रीय स्पर्धेत 45 किलो वजनी गटात पहिल्यांदा च सहभागी होत चुरशीच्या लढतीत 65 किलो स्नॅच व 79 किलो क्लिन जर्क असे 144 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले 45 किलो ज्युनिअर गटामध्ये मेघा संतोष आहेर हिने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत 56 किलो स्नॅच व 79 किलो क्लिन जर्क असे एकूण 135 किलो वजन उचलून पाचवा क्रमांक मिळविला
लागोपाठ दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे संदीप, पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस के, आर टी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, श्री गुरू गोविंद सिंग हायस्कुलचे प्राचार्य सदाशिव सुतार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.